शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
4
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
5
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
6
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

लेख: शहरांच्या भिंती अशा चित्र-विचित्र रंगतात, त्यामागच्या कहाण्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 09:17 IST

अतृप्त भावना, स्वातंत्र्याची आस आणि उन्मादातला आनंद ग्राफिटीच्या मुळाशी असतो. भिंतींवर उमटणारी ग्राफिटी हा वर्तमानाचा आरसा आहे.

-हिमानी नीलेश (सिनिअर लायब्ररी ऑफिसर, ॲडलेड, ऑस्ट्रेलिया)
जोना इथे पडीक असायचा. ऑस्ट्रेलियातल्या ॲडलेड या आमच्या शहरात दुर्लक्षित झालेल्या जुन्या प्रॉपर्टीच्या मागे त्याला मोकळं रान मिळायचं. दोन वेळा तिथे ग्राफिटी केल्यानंतर शिक्षा म्हणून नगरपालिकेनं त्याला ती पुसायला लावली. जोनासारख्या भटक्या दिलखुलास तरुणासाठी अशा रितीनं पकडलं जाणं आणि आपली कारागिरी पुसली जाणं हे भलतंच नामुष्कीचं होतं.

अमेरिकेत १९६० मध्ये डॅरील मॅक रे उर्फ कॉर्नब्रेड या तरुणाने पहिल्यांदा मॉर्डन ग्राफिटी करायला सुरुवात केली. त्याला कॉर्नब्रेड हे नाव कसं पडलं याची अजून एक रोचक कहाणी आहे. हा डॅरील सुधारगृहात असताना त्याला त्याच्या आजीच्या हातच्या कॉर्नब्रेडची आठवण येई. तिथल्या स्वयंपाक्याकडे तो सतत  कॉर्नब्रेडची मागणी करत असे. मग त्याने स्वत:चं ते टोपण नावच करून टाकलं. हे नाव तो ग्राफिटीमधल्या टॅगिंग प्रकारासाठी वापरत असे. थोडा वयात आल्यावर तो सिंथियाच्या प्रेमात पडला आणि कॉर्नब्रेड लव्हज सिंथिया असा मेसेज त्याच्या ग्राफिटीमधून सर्वत्र भिंतींवर गिरवू लागला. 

अतृप्त भावना, स्वातंत्र्याची आस आणि उन्मादातला आनंद असं बहुदा ग्राफिटीच्या मुळाशी दिसून येतं असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. तर अशा ग्राफिटीवीरांना लगाम घालण्यासाठी खट्याळ मुलालाच वर्गप्रमुख केल्याप्रमाणे तेव्हाच्या महापौराने ग्राफिटीकडून म्युरल्सकडे अशा संघटनेचं अध्यक्षपदच कॉर्नब्रेडला दिलं. मग त्यानं ते काम हिरिरीने केलं. आज तो तरुणांचा दिशादर्शक आणि एक वक्ता म्हणून काम करतो.

या ग्राफिटीचे पडसाद जगभरात दिसतात. ऑस्ट्रेलियात स्प्रे पेंटिंगची बाटली घेऊन जिथे कोणी पोचू शकणार नाही अशा उंचीवर, अंधाऱ्या गल्लीत, जुन्या दुर्लक्षित जागांमध्ये असे उद्योग अनेक मंडळी करताना दिसतात. ज्या दुकानांमध्ये अशा बाटल्या विकल्या जातात त्यांना चक्क कुलूप घातलं जातं. त्यामुळे या बाटल्या पळवल्या जात नाहीत. तरीदेखील मेलबर्नच्या अगदी शहराच्या मधोमध असलेल्या काही गल्ल्या तर केवळ ग्राफिटीसाठीच प्रसिद्ध आहेत. 

इथली एसीडीसी लेन ही इथल्या प्रसिद्ध रॉकबॅण्डच्या नावाने ओळखली जाते. कारण इथे बहुतांशी म्युझिक म्युरल्स केली जातात. होईजर लेनमध्ये राजकीय भाष्य करणारी ग्राफिटी दिसते. १९८०च्या सुमारास जेव्हा नुसती ग्राफिटी बंद होऊन त्यात कलात्मकता आली आणि ग्राफिटीचा बाज तसाच ठेवून म्युरल्स होऊ लागली तेव्हा तिथे प्रवाशांचा ओघ सुरू झाला. मग राजकारण्यांनीदेखील याचं महत्त्व ओळखलं.
 
मॉडर्न ग्राफिटी  रंगीबेरंगी असते. त्यात थ्रो अप, थ्रीडी असे अनेक प्रकार असतात. काही  ग्राफिटी आर्टिस्ट  ग्राफिटीच्या चित्रांचं प्रदर्शन भरवतात. पब्ज, व्यायामशाळा, मोठी पाण्याची टाकी अशा ठिकाणी तुम्हाला ग्राफिटी करून हवी असेल तर त्याचं रितसर कंत्राटपण घेतात. आपल्याकडे पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात गिरगोट्या असलेल्या कित्येक भिंतींचं रूपांतर उत्स्फूर्त स्वयंसेवकांनी वेधक चित्रांमध्ये  केलेलं बघितल्यावर डोळे आणि मन दोन्ही निवतं. आज जोनाच्या ग्राफिटीची बातमी पुन्हा वाचली. त्याच्या घरची परिस्थिती सध्या ठीक नाहीये !
himaninilesh123@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : The Stories Behind Cities' Walls and Their Colorful Graffiti Art

Web Summary : Graffiti's origins trace back to 1960s America. From tags to artistic murals, it evolved globally. Cities now embrace graffiti art, with designated lanes and contracted artists transforming urban spaces. It reflects freedom and expression.
टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी