शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

शेवटचा सत्यशोधक, स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेल्या या माणसाने मग अनेकदा अंधारून येतानाही पाहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 08:02 IST

महानगरपालिकेच्या राजकारणातही काही काळ ते उतरले. नंतर मात्र त्यांनी आपली वाट निवडली. बाबाच एकदा म्हणाले होते, ‘विधिमंडळाची दोन सभागृहे असतात. एक विधानसभा आणि दुसरी विधानपरिषद. तिथे जाण्यासाठी, बहुमत आणण्यासाठी, सत्ता स्थापून मंत्री होण्यासाठी सगळे राजकारण होत असते.

स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा डॉ. बाबा आढाव सतरा वर्षांचे होते. पं. नेहरूंनी नियतीशी केलेल्या कराराचे ते साक्षीदार होते. स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेल्या या माणसाने मग अनेकदा अंधारून येतानाही पाहिले. मात्र, या प्रत्येक वळणावर स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी, लोकशाही जपण्यासाठी आणि समतेचे मूल्य अधोरेखित करण्यासाठी बाबा उभे ठाकले. अखेरच्या क्षणापर्यंत लढत राहिलेल्या बाबांनी शेवटचा श्वास घेतला, तेव्हा लाखो कष्टकऱ्यांना हुंदका अनावर झाला. डॉ. बाबा आढाव विचारवंत होतेच, पण रस्त्यावर उतरणारे लोकनेते होते. बाबांनी पायाभरणी केलेल्या चळवळींची, विधायक उपक्रमांची यादी खूपच मोठी आहे. एक गाव-एक पाणवठा, एक गाव-एक मसणवट, सामाजिक कृतज्ञता निधी, हमाल पंचायत, कष्टाची भाकर, कागद-काच-पत्रा पंचायत, रिक्षा पंचायत, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची चळवळ, भटक्यांची चळवळ, देवदासी मुक्ती चळवळ, मनुपुतळा हटाव चळवळ, राष्ट्रीय एकात्मता चळवळ, विषमता निर्मूलन शिबिरे, हरिनाम सप्ताहविरोधी आंदोलन, दुष्काळ निर्मूलन परिषदा, माहिती अधिकार कायदा, आळंदी-पंढरपूर वारीतील दिंड्यांमधील जातविषमता मिटवण्याचे आंदोलन, महिला विडी कामगार आंदोलन; परित्यक्ता, अपंग, असुरक्षित, अंगमेहनती, कष्टकरी, हमाल मापाडी, मातेरे गोळा करणारे, रिक्षा-टेम्पो चालक, चाळणा कामगार, बांधकाम मजूर, पथारी व्यावसायिक आदींसाठीची आंदोलने. ही यादी आणखीही वाढवता येऊ शकते. बाबा हे खऱ्या अर्थाने लोकांचे नेते होते.

महानगरपालिकेच्या राजकारणातही काही काळ ते उतरले. नंतर मात्र त्यांनी आपली वाट निवडली. बाबाच एकदा म्हणाले होते, ‘विधिमंडळाची दोन सभागृहे असतात. एक विधानसभा आणि दुसरी विधानपरिषद. तिथे जाण्यासाठी, बहुमत आणण्यासाठी, सत्ता स्थापून मंत्री होण्यासाठी सगळे राजकारण होत असते. ज्यांना हे जमत नाही ते विरोधात बसतात. यापलीकडे एक सभागृह आहे. ते आहे रस्त्यावरच्या चळवळींचे तिसरे सभागृह. जनसभा! मी त्याचा तहहयात अध्यक्ष आहे!’ त्यामुळे न थकता ते सदैव लोकांसोबत उभे ठाकले. भारताचे वैशिष्ट्य काय असेल, तर या देशाचे सगळे ‘फाउंडिंग फादर्स’ एकाच वेळी रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते होते आणि त्याचवेळी ‘ॲकॅडमिशियन’ही होते! महात्मा फुले असोत की शाहू महाराज. गांधी असोत की नेहरू. आंबेडकर असोत की मौलाना आझाद. हे सारेच तसे होते.  अशा माणसांनीच जनजीवन फुलवले. सामान्य माणसाला आपल्या लढाईचा केंद्रबिंदू केले. ज्याला कोणी नाही, अशा समूहाला उराशी कवटाळले. म्हणून आजचा भारत उभा आहे. बाबा त्याच वाटेवरून चालणारे नेते होते. त्यांना परंपरेचा अवकाश समजला होता आणि त्यावर उभे राहून जो आधुनिक देश उभा करायचा, त्याचेही भान बाबांना होते. म्हणून ते म्हणाले होते, ‘शोषणाच्या लढाईत कार्ल मार्क्सच्या पुढे जावे लागणार आहे. परिवर्तनवादी चळवळीने चीनचा कम्युनिझम स्वीकारावा की, रशियाचा मार्ग स्वीकारावा या चर्चेपेक्षाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही व्यवस्थेवर दाखवलेला विश्वास मला महत्त्वाचा वाटतो आणि हाच एक पर्याय परिवर्तनवादी चळवळींपुढे आहे.’ आज चळवळीच संपल्यासारखे वातावरण भवताली आहे. मुद्दा फक्त व्यवस्थेचा आणि माध्यमांचा नाही. मुद्दा दहशतीचाही नाही. मुद्दा आहे, लोकांनी विश्वास ठेवावा, असे कोण आहे? काळ बदलला, हे याचे कारण नाही. ट्रम्प आणि पुतिन यांच्यापेक्षाही भयंकर असणारे हिटलर आणि मुसोलिनी होतेच. तेव्हाही, त्याच काळात भारताने गांधी स्वीकारला. सगळ्या दडपशाहीला तो पुरून उरला. एका गांधींनी आवाज दिला आणि लाखो बायबापड्यांनी रस्त्यावर उतरून त्यांना प्रतिसाद दिला. एका बाबासाहेबांनी आवाज दिला आणि जनसागर त्यांच्यासोबत गेला.

हे घडवण्याची क्षमता असणारे डॉ. बाबा आढाव हे अखेरचे नेते होते. कष्टकऱ्यांचे पुढारी होतेच, पण बदलावर विश्वास असणारे कलासक्त होते बाबा. त्यामुळेच कोणत्याही कार्यक्रमाला बाबा आले की सोनचाफ्याचा गंध येत असे. प्रत्येकाच्या हातावर चाफ्याची फुले देत बाबा उमलायला शिकवत. जोहरान ममदानी न्यूयॉर्कचे महापौर झाल्यावर बाबा म्हणाले, ‘कष्टकरी एकवटला तर तो सत्तांध तख्त उलथवून टाकतो’. आज सर्वाधिक गरज असतानाच, पन्नालाल सुराणा गेले. आता बाबा गेले. एक पर्व संपले. बाबा नावाचे गाव गेले. पण, हा पाणवठा अखंड असणार आहे. ‘सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर’ हा बाबांचा आवाज आसमंतात भरून राहणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Last Satyashodhak: Witness to Independence, Saw Darkness But Fought On

Web Summary : Dr. Baba Adhav, a freedom movement participant, championed equality and fought for the working class until his last breath. A true leader, he initiated numerous social movements, advocating for the marginalized and envisioning a modern, equitable India, leaving behind a legacy of relentless activism.
टॅग्स :Baba Adhavबाबा आढाव