शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण ? महापालिका : नागरिकांकडून पाणीपट्टी वसुली तर चोरट्यांना ‘अभय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:05 IST

डल्ला मारणाऱ्यांना महापालिका प्रशासनातर्फे अभय

धुळे : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या झळा सहन करीत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे़ तर दुसरीकडे मात्र व्हॉल्व गळत्यांव्दारे नागरिकांच्या हक्काच्या पाण्यावर सर्रासपणे डल्ला मारणाऱ्यांना महापालिका प्रशासनातर्फे अभय दिले जात आहे़दीड महिना पुरेल एवढाच जलसाठामहापालिकेतर्फे तापी पाणी पुरवठा योजना, डेडरगाव व नकाणे तलावातून शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नकाणे व डेडरगाव तलावात जेमतेम साठा आहे़ नकाणे तलावात केवळ ३५ ते ४० एमसीएफटी पाणीसाठा होता. त्याची साठवण क्षमता ३५५ एमसीएफटी असून त्यात सद्यस्थितीत केवळ १२८ एमसीएफटी पाणीसाठा उपलब्ध आहे.नियोजनाचा पूर्ण अभावतापी जलवाहिनीवरील १६ गळत्यांची दुरूस्ती काही दिवसापुर्वी करण्यात आली होती़ दुरुस्तीनंतर शहरातील काही प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले आहे़ मात्र अद्याप काही प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती लागत आहे़ शहरात सुरळीत पाणीपुरवठा व उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे़हजारो लीटर पाणी अक्षरश: वायामुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ बुधवारी शहराला पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्वची लोंखंडी तबकडी निघाल्याने लाखो लीटर पाणी नदीपात्रात वाहून वाया जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील पाण्याचा उपयोग वरखेडीसह परिसरातील स्थानिक नागरिकांसह विटा भट्टीसाठी केला जातो. त्यासाठी व्हॉल्व लिकेज करण्यात येतो़ व्हॉल्व दुस्स्तीनंतर पाणी चोरी करणाºया नागरिकांना महापालिका पथकाने गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे़पाण्याचा वापर वाढला!शहराचा वाढता विस्तार पाहता मनपाला दरवर्षी जलस्त्रोतांमधील आरक्षित पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज भासत आहे़ वाढती लोकसंख्या व जीर्ण जलवितरण यंत्रणा व पाण्याचा अपव्यय यांमुळे पाण्याची मागणी, वापर वाढत आहे़पाणीचोरी रोखण्याचे आव्हानमहापालिकेला शहराला करावयाच्या पाणीपुरवठ्याचा भार डोईजड झाला आहे. त्यासाठी शहरासह परिसरातील अवैध नळधारकांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करून विशेष मोहिम राबविण्याची गरज आहे़ त्याचप्रमाणे पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई, सदोष पाणीपट्टी आकारणीवरही कटाक्ष टाकणे आवश्यक आहे़शहरातील अवैध नळधारकांकडे दुर्लक्ष करीत नियमित पाणीपट्टी भरणाºया नागरिकांवरील बोजा वाढल्यास मनपाविरोधात तीव्र रोष निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती आहे.

टॅग्स :Dhuleधुळे