महानगरातील बेवारस वाहनांचा मालक आहे तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:33 AM2021-03-08T04:33:30+5:302021-03-08T04:33:30+5:30

मनपाकडून एकाही वेळी शहरातील बेवारस वाहनांवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे रस्त्यावर व घरासमोर लावलेली भंगार वाहने नागरिकांना ...

Who owns the unattended vehicles in the metropolis? | महानगरातील बेवारस वाहनांचा मालक आहे तरी कोण?

महानगरातील बेवारस वाहनांचा मालक आहे तरी कोण?

Next

मनपाकडून एकाही वेळी शहरातील बेवारस वाहनांवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे रस्त्यावर व घरासमोर लावलेली भंगार वाहने नागरिकांना वाहतुकीसाठी अडचणीचे ठरत आहे. २४ तासांपेक्षा जास्त काळ रस्त्यावर थांबलेल्या वाहनांना पालिकेमार्फत नोटीस दिली जात होती. तरीही वाहने न हटविल्यास मनपाकडून संबंधितांना दंड आकारला जात होता. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी घरासमोर तसेच रस्त्याच्या कडेला वाहने लावलेली दिसून येतात. मात्र, पुन्हा एकदा बेवारस वाहनांचा प्रश्न धुळेकरांना सतावत आहे.

अशा वाहनांमुळे अस्वच्छता

बहुतांश चौकात अशा प्रकारची बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांमुळे परिसराचे विद्रूपीकरण होतेच. त्याव्यतिरिक्त या गाड्यांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असते. ही वाहने धुळीने भरलेली असतात. तसेच या गाड्यांच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो.

Web Title: Who owns the unattended vehicles in the metropolis?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.