शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

त्या विद्यार्थ्यांच्या सायकलची चाके वर्षभरापासून थांबली कोरोनाचा परिणाम : रेल्वे बंदमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सायकली धुळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST

धुळे-चाळीसगाव लोकल रेल्वेच्या मार्गावरील मोरदड, खोरदड, मोरदड तांडा, चांदे यासह इतर गावातील शेकडो विद्यार्थी रेल्वेने धुळ्याला येतात. सकाळचे काॅलेज ...

धुळे-चाळीसगाव लोकल रेल्वेच्या मार्गावरील मोरदड, खोरदड, मोरदड तांडा, चांदे यासह इतर गावातील शेकडो विद्यार्थी रेल्वेने धुळ्याला येतात. सकाळचे काॅलेज आटोपले की शहरातील विविध वाचनालये आणि अभ्यासिकांमध्ये अभ्यास करीत बसतात. सायंकाळच्या रेल्वेने घरी परततात. रेल्वेस्टेशनपासून काॅलेजला जाण्याकरिता सायकल हवी म्हणून स्वत:ची सायकल कायमस्वरूपी रेल्वेस्टेशनच्या पे ॲण्ड पार्कमध्ये लावलेली असते. सकाळी रेल्वेने आल्यावर सायकलीने काॅलेजला जाणे आणि सायंकाळी सायकल त्याच ठिकाणी लावून गावी परतणे, असा हा दिनक्रम गेल्या वर्षभरापासून थांबलेला आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या सायकली रेल्वेस्टेशनच्या पार्किंग लाॅटमध्ये धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे पार्किंगचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचे उत्पन्न थांबले आहे. तरीदेखील संबंधित व्यक्ती सायकलींची राखण करीत आहे. विद्यार्थ्यांनी सायकली घेऊन जाव्यात, असे आवाहन वेळोवेळी केले आहे. पैसे दिले नाहीत तरी चालेल असे त्यांचे म्हणणे आहे. पंरतु विद्यार्थ्यांना सायकली गावी घेऊन जाणे परवडणारे नसल्याने आम्ही सायकली घेऊन जात नाहीत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

काही सायकली गेल्या चोरीला

रेल्वेस्टेशनच्या पार्किंग लाॅटमधून काही विद्यार्थ्यांच्या सायकली चोरीस गेल्याचे बोलले जात आहे. मोरदड तांडा येथील महेश सखाराम चव्हाण, गयनाथ नेमीचंद राठोड, एमजी रतन राठोड, बळीराम गोपीचंद चव्हाणे यांच्यासंह इतर गावातीलही काही विद्यार्थ्यांच्या सायकली चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. याच गावातील गणेश एकनाथ चव्हाण याची सायकल मात्र सुरक्षित आहे. विद्यार्थ्यांनी आपापल्या सायकली घेऊन जाव्यात, असे आवाहन संबंधितांनी केले आहे.