शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील अमरावती प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’च्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 12:12 IST

प्रकल्पामुळे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील २६०६ हेक्टर जमीन ओलिताखाली

आॅनलाइन लोकमतमालपूर (जि.धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प यावर्षी झालेल्या तुरळक पावसावर देखील क्षमतेने भरुन ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असल्याचेआहे.१४ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मागील वर्षी हा प्रकल्प ओसांडून वाहुन निघाला. मात्र यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत खुपच तुरळक पाऊस झाला. १५ जुननंतर येथे शेतशिवारातुन पाणी बाहेर निघालेच नाही. तरी देखील धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या पावसामुळे या प्रकल्पाची पाणी पातळी २२४.८५ मीटर पर्यंत पोहचली असुन सध्या पाण्याचा ओघ सुरुच असुन २२५.७० मीटर पर्यंत पाणी साठा झाल्यावर हा प्रकल्प यावर्षी देखील पुर्ण क्षमतेने भरुन ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.हा प्रकल्प धुळे नंदुरबार जिल्हांच्या सिमेवर मालपूर गावापासून दोन किलो मीटर पश्चिम दिशेला नाई व अमरावती नदीवर बांधलेला आहे. याची याची महूर्तमेढ १९८० साली रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून झाली होती. याला पुर्ण व्हायला सन २००६ उजाडले. तब्बल २६ वषार्नंतर हा प्रकल्प पुर्णत्वास येवून पहिल्याच वर्षी पुर्ण क्षमतेने भरला. मात्र त्यानंतर भरायला एक तप पुर्ण होवुन १३ वर्ष प्रतिक्षा करावी लागली. तेव्हा मागील वर्षी ओसांडून वाहुन निघाला. यावर्षी तुलनेने खुपच कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. मात्र या प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात शनिमांडळ कडे सतत पाऊस होत असल्यामुळे तसेच मागील वषीर्चा जिवंत साठा शिल्लक असल्यामुळे भरण्याच्या उंबरठ्यावर असुन पाण्याची लेव्हल येण्यास फक्त एक मीटर पाणी साठा येण्याची गरज असुन नाई व अमरावती या दोनही नद्यांमधून जलस्रोत वाहत असुन हा प्रकल्प यावर्षी देखील क्षमतेने भरुन ओव्हरफ्लो होईल असे या प्रकल्पाचे प्रभारी शाखा अभियंता प्रशांत खैरनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मागील वर्षीच्या म्हणजे ३०जुन पर्यंत या प्रकल्पात पाणी पातळी २२२.९० मीटर म्हणजे ३२० दक्षलघफु.होती. हा जिवंतसाठा होता. यात वाढ होवुन १३ सप्टेंबर मधरात्री पर्यंत २२४.८५ मीटर म्हणजे ५५८ दक्षलघफुच्या वर दिसून येत आहे. २२५.७० पाणी पातळी झाल्यावर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरुन यापुढे पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून आल्यास या प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.यामुळे रात्री बेरात्री पाऊस झाल्यास अमरावती नदी काठावरील नागरिकांनी तसेच दोंडाईचा शहरातील नदीकाठी राहणाº्या नागरिकांनी सावध रहावे. मागील वर्षी खरीप व रब्बी दोन्ही हंगामात शेती साठी आवर्तन सोडण्यात आली होती. रब्बी हंगाम ७० हेक्टर व कालव्या प्रवाहामध्ये २१० असे एकुण १८० हेक्टरला याचा लाभ मिळाला होता. यातुन ४९ हजार रुपये वसुली होवुन अद्याप ५६ हजार थकबाकी असल्याचे प्रकल्पाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.दोन्ही कालवे मिळुन शिंदखेडा तालुक्यातील २५७१ हेक्टर व नंदुरबार जिल्ह्यातील ३५ हेक्टर असे एकुण २६०६ हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे