वडजाई उपकेंद्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:35 IST2021-04-10T04:35:10+5:302021-04-10T04:35:10+5:30

वडजाई येथील उपकेंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. फ्लोरिंगला स्टाईल नसल्यामुळे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात छताला गळती लागते. भिंतींना खड्डे ...

Wadjai will send a proposal for repair of the substation | वडजाई उपकेंद्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविणार

वडजाई उपकेंद्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविणार

वडजाई येथील उपकेंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. फ्लोरिंगला स्टाईल नसल्यामुळे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात छताला गळती लागते. भिंतींना खड्डे पडले आहेत. खिडक्या खराब झाल्या आहेत. बिल्डिंगची फारच दुरवस्था झाली आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत, पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता कैलास सोनार यांनी. ८ रोजी स्वत: उपकेंद्राची पाहणी करून दुरुस्ती व इतर वाढीव कामासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविणार आहेत, तसेच येणाऱ्या आर्थिक वर्षात सर्व साहित्य खरेदी करून त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. वडजाई येथील उपकेंद्रातील कर्मचारी चांगल्या प्रकारे सेवा देतात, परंतु त्यांना केंद्रात सुविधाच उपलब्ध नसतील, तर ते काय करणार. त्यामुळे त्याचाही इलाज खुटतो. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करून प्रस्तावास त्वरित मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून केंद्राची दुरवस्था दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Wadjai will send a proposal for repair of the substation