शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भोंगऱ्या बाजारातून घडले संस्कृतिचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:59 IST

पारंपारिक नृत्याने सर्वांचे वेधले लक्ष, लाखोंची झाली उलाढाल

आॅनलाइन लोकमतशिरपूर (जि.धुळे) : आदिवासी बांधवासाठी आनंदाची पर्वणी असणाºया भोंगºया उत्सवास मोठ्या थाटात सुरुवात झालेली आहे. या उत्सवात सहभागी झालेले समाजबांधव व तरुणाईने लोकगीत गायन, बासरी वादन व ढोल वादनाचे विविध प्रकार व नृत्याविष्कार सादर करीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवित आहे. बोराडी येथे सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या या उत्सवात आदिवासी बांधवाची गर्दी दिसून आली. विशेषत: या बाजारात महिलांची लक्षणीय हजेरी दिसून आली़५ रोजी बोराडी गावाचा आठवडा बाजाराचा दिवस होता. त्यादिवशी हा भोंगºया बाजार भरला़ उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींसाठी हा बाजार म्हणजे आनंद द्विगुणित करून व्यक्त करण्याचे मोठे ठिकाण आहे. परिसरातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. भोंगºया बाजारात आप-आपली दुकाने थाटण्यासाठी निरनिराळ्या व्यावसायिकांनी रस्त्याच्या दुतर्फा तात्पुरत्या दुकानासाठी जागा उपलब्ध करून घेतल्या होत्या.बाजार समितीच्या उपबाजार आवारापासून ते पानसेमल रस्त्यापर्यंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत गाडगे महाराज नगर, साने गुरूजी नगर, बसस्थानक आवार आणि रस्त्याच्या दुतर्फावर विविध विके्रत्यांनी दुकाने थाटली होती. भोंगºया बाजाराच्या दिवशी गावातील वातावरण उत्साही दिसून येत होते.सकाळी ११ वाजेपासूनच मालकातर, धाबापाडा, झेंडेअंजन तसेच परिसरातील गावांमधील आदिवासी युवक-युवती विविध वेशभूषा करून आले होते.आदिवासी बांधवांनी सजविलेल्या बैलगाडीतून तर काही मिळेल त्या वाहनातून बाजाराला आले होते. गावाजवळच्या पाड्यातून येणाºया आदिवासी बांधवांनी मोठ्या आकाराचा ढोल, तीरकामठा, कास्याची गिरमी, बासरी आदी साहित्य सोबत आणले होते. दुपारनंतर बाजारात गर्दी उसळली होती.तरूण-तरूणींनी खास आदिवासी पोषाख, काहींनी कमरेभोवती आकर्षक शाली गुंडाळल्या होत्या. डोंगर दऱ्यांमध्ये राहणाºया आदिवासींच्या डोक्यावर असलेल्या टोप्यांवर निरनिराळे प्राणी-पक्षांचे चित्र होती. पारंपारिक आदिवासी गितांसह काही हिंदी चित्रपटांच्या गितांचा सुरही आपल्या बासरीतून वाजवित होते. अनेक आदिवासी बांधव गटा-गटाने नृत्य करून आनंद लुटला. बाजारामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. भोंगºया बाजार पहाण्यासाठी खास बाहेर गावाहून आदिवासी मंडळींनी हजेरी लावली होती. आदिवासी महिला व तरूणींनी वस्त्रालंकार तसेच गृहपयोगी वस्तुंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली. आदिवासी भागातील इतर भागापेक्षा बोराडी बाजार मोठ्या स्वरूपात भरला होता.या बाजारात आदिवासी वर्षाला लागणारे संसारपयोगी वस्तु खरेदी करतात. यात गुळ, डाळ्या, गोडशेव, भांडी, खेळणी, साड्या, कापड, बेनटेक्स दागिने आदी वस्तुंची दुकाने थाटली होती. आदिवासी मोठ्या स्वरूपात बाजारातील वस्तु खरेदी करतात. सुमारे २० ते २२ लाखाची उलाढाल येथील बाजारात झाली. आदिवासी महिला हा धार्मिक सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. ढोलच्या तालावर नाच-गाण्याचा आनंद लहान-मोठे-थोर महिला-पुरूष घेत होते.जि.प. अध्यक्षांचा सहभागबोराडी येथील भोंगºया बाजारात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधेही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनीही मोठा ढोल वाजविला होता. यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, सदस्य शामकांत पाटील, रमण पावरा, रवींद्र शिंदे, राज निकम आदी उपस्थित होते.बोराडी गावाचा आठवडा बाजार हा गुरूवारी असतो. नेहमीच्या आठवडे बाजारापेक्षा आज मात्र इतर दिवसापेक्षा बाजार अधिक फुलला होता. सर्वच रस्ते गर्दीने फुललेले दिसत होते. होळी सणांसाठी लागणारा सामान व साहित्यांची खरेदी आदिवाासी मोठ्या प्रमाणावर करतांना दिसत होते. पारंपारिक पध्दतीचे लागणारे कपडे व दाग-दागिन्यांच्या दुकानासह लहान मुला-मुलींसाठी व स्वत:साठी कपडे त्याचबरोबर होळी सण साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सामानांची व वस्तुंचे दुकाने ही विक्रीसाठी सज्ज होते. ठिकठिकाणी पान दुकाने लागली होती. दिवाळी सणासारखा कुटुंबातील सर्व लहान थोर आबाल वृध्द हा सण उत्साहाने साजरा करतात. एवढेच नाहीतर सालदारी वा रखवालदारीसाठी बिगर आदिवासी भागात असलेले पावरा लोक हा सण साजरा करण्यासाठी आपापल्या गावी परतलेले आहेत. त्यातूनच त्यांनी आपल्या आदिवासी संस्कृतीची जोपासना केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे