शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकाराचा सद्उपयोग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:56 IST

चर्चासत्रातील सूर : क्रांती बहुउद्देशीय संस्थेतर्फे उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : माहितीचा अधिकार हा खूप व्यापक आहे़ त्याचा उपयोग न्यायासाठी झाला पाहीजे असा सूर चर्चासत्रातील मान्यवरांच्या मनोगतून निघाला़ बसस्थानकाच्या आवारात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे आणि क्रांती बहुउद्देशीय महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने माहिती अधिकार कायद्यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते़ याप्रसंगी बसस्थानक प्रमुख एम़ ए़ तिवारी, अ‍ॅड़ जितेंद्र निळे, अ‍ॅड़ अश्विनी पाटील, अ‍ॅड़ चंद्रकांत येशीराव, आशा वसईकर आदींची उपस्थिती होती़ अध्यक्षस्थानी अ‍ॅड़ डी़ डी़ जोशी उपस्थित होते़ अ‍ॅड़ निळे म्हणाले, माहिती अधिकार हा खूप छोटा कायदा असलातरी त्याचे स्वरुप व्यापक आहे़ या कायद्याच्या आधारे कोणीही अन्यायाला वाचा फोडण्याची क्षमता ठेवू शकतो़ दीपावली आणि सण-उत्सवाच्या काळात खासगी प्रवासी वाहनधारकांकडून कशाप्रकारे आर्थिक पिळवणूक करतात, हे स्पष्ट केले़ हा प्रकार सुध्दा एक प्रकारे प्रवाश्यांवर होणारा अन्याय असून या प्रकाराला वाचा फोडणे आवश्यक आहे़ तिवारी म्हणाले, राज्य परिवहन महामंडळामार्फत प्रवाश्यांच्या सोईसाठी आणि प्रवाश्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून प्रवासाचे दर २० ते २५ टक्के कमी करण्यात आलेले आहेत़ प्रवाश्यांची जादा गैरसोय टाळावी यासाठी जादा बसेस सज्ज करण्यात आलेले आहे़ नागरीकांनी त्याचा लाभ घ्यायला हवा़ अ‍ॅड़ अश्विनी पाटील यांनी त्यांच्या मनोगतातून माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत आपणास कोणत्या स्वरुपाची माहिती जाणून घेता येते याबाबत वर्गीकरणासह स्पष्टीकरण केले़ माहिती अधिकाराचा अर्ज कशा स्वरुपात भरावा याचे विश्लेषण केले़अ‍ॅड़ जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून माहिती अधिकार अधिनियमाचा सद्उपयोग करावा व माहिती अधिकार कायद्याच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन केले़ माहिती अधिकार अधिनियमातंर्गत प्रत्येक व्यक्ती आपले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी लढा देवू शकते़ यासाठी माहिती अधिकार अधिनियमाचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही जोशी यांनी सांगितले़ सुत्रसंचालन तुषार अहिरे यांनी केले़ आभार रुक्मिणी ओझा यांनी मानले़ ईश्वर बारी, भावना क्षीरसागर, अरुण सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, हेमराज साळुंखे, अकबर पिंजारी, विशाल येशीराव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले़ 

टॅग्स :Dhuleधुळे