शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
3
"माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
4
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
5
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
6
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
7
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
8
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
9
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
10
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
11
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
12
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
13
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
14
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
16
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
17
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
18
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
19
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
20
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
Daily Top 2Weekly Top 5

बाबरे गावात जवानांचे अनोखे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : देशाच्या संरक्षणासाठी सैन्यदलात सतरा वर्षे सेवा देवून निवृत्त होत गावात परतलेल्या दोन जवानांचे अनोख्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देशाच्या संरक्षणासाठी सैन्यदलात सतरा वर्षे सेवा देवून निवृत्त होत गावात परतलेल्या दोन जवानांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले़ बाबरे येथील ग्रामस्थांनी रक्तदान करुन या जवानांचा सेवापूर्ती सोहळा साजरा केला़ यावेळी संकलीत झालेले ४५ रक्तदात्यांचे रक्त हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला देण्यात आले़धुळे तालुक्यातील बाबरे गावातील गोविंदसिंग रौंदळे व दीपक जाधव हे दोन जवान नुकतेच भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले़ गोविंदसिंग यांनी आर्मी मेडिकल कोअर म्हणून कारगिल द्रास सेक्टर जम्मू व काश्मीर, पणजी गोवा, आर्टिलरी तोफखाना युनिट आसाम हिमाचल प्रदेश येथे व कमांड हॉस्पिटल कलकत्ता नंतर कमांड हॉस्पिटल पुणे अशी १७ वर्षे अविरत सेवा बजावली़ तसेच दीपक जाधव यांनी आर्टिलरी रेजिमेंट पठाणकोट, फरीदकोट पंजाब, त्यानंतर कुपवाडा जम्मु काश्मीर येथे दुर्गम डोंगर रांगेत, उधमपुर जम्मु येथील असंवेदनशील परिस्थितीत व शेवटी मथुरा उत्तर प्रदेश अशी सतरा वर्षे सेवा पूर्ण केली़ दोन्ही मातृभूमीची सेवा करुन एकाच दिवशी घरी आल्याबद्दल गावातील तरुणांनी रक्तदान करून अनोख्या पध्दतीने त्यांचा सेवापूर्ती सोहळा साजरा केला़ विशेष म्हणजे या दोन्ही जवानांनी देखील रक्तदान केले़ त्यानंतर दोघा जवानांची गावातून मिरवणूक काढण्यात आली़धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते़ यात ४५ तरुणांनी रक्तदान केले़ रक्तदान शिबीरासाठी डॉ़ राजेश ठाकूर , चंदुलाल साठे, रवींद्र पवार, अरुण चौधरी, राजू कुलकर्णी, राजू महाडिक, दीपक कासार यांनी सहकार्य केले़ रक्तदान शिबिराचे उद्घाटन राजपूत समाजाचे अध्यक्ष डॉ़ दरबारसिंग गिरासे, गणेश गर्दे यांनी केले़ यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, आमदार कुणाल पाटील यांचे रुग्णसेवक गोकुळ राजपूत, तुषार गर्दे, संजय भालेकर, संभाजी भालेकर, आनंदा मोरे, आनंदा गायकवाड उपस्थित होत़े कार्यक्रमाचे आयोजन खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष राजपूत, निंबा राजपूत, अमोल राजपूत, धोंडू राजपूत यांच्यासह आदिवासी तरुणांनी केले होते़

टॅग्स :Dhuleधुळे