शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कासारे येथे दोन टप्यात लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST

येथील ग्रामपंचायत सभागृहात तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच विशाल देसले, जिल्हा ...

येथील ग्रामपंचायत सभागृहात तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच विशाल देसले, जिल्हा परिषद सदस्य गोकूळसिंग परदेशी यांच्यासह गावातील सर्व व्यापारी, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते,पोलीस पाटील दीपक काकूस्ते, धीरज देसले, माजी सरपंच राकेश देसले, अनिल देसले, सदस्य बाळा खैरनार,रवींद्र चव्हाण, प्रशांत देसले, सचिन देसले, दीपक चौधरी उपस्थित होते.

गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बहुसंख्येने वाढत आहेत त्यासाठी संपूर्ण व्यापारी वर्गाला विश्वासात घेऊन लॉकडाऊन व्हावे, असे प्राचार्य विकास देसले व विलास देसले यांनी सांगितले. गावातील वाढते रुग्ण संख्येचा विचार करून तपासणी कॅम्प होणेबाबत सुचविले. गावातील डॉक्टरांनी पेशंट तपासणी पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरटीसीपीआर चाचणी करूनच उपचार करावेत, असे सरपंच विशाल देसले यांनी सुचविले. जिल्हा परिषद सदस्य गोकूळसिंग परदेशी यांनी गावातील पॉझिटिव्ह रुग्णांना उपचार भाडणे कोविड सेंटरला करावा. प्रशासनाने औषधांचा मुबलक साठा तालुक्यासाठी उपलब्ध करून द्यावा. प्राथमिक तपासणी आरोग्य केंद्रात करावी, असे सांगितले.

तहसीलदार प्रवीण चव्हाणके म्हणाले की, गावातील प्रत्येक कुटुंबाची घरोघरी जाऊन तपासणी करणेकामी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी नियोजन करावे. ग्रामपंचायतीने सर्वेक्षण पथकासाठी संपूर्ण मदत करावी. सर्वेक्षणासाठी तीस पथक तयार कराव्यात. प्रत्येक पथक ६० ते ७० कुटुंबांची तपासणी करेल .आरोग्य विभागाकडून रॅपिड एंटिजन टेस्ट उपलब्ध करावी. गावात कुठल्याही सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. होमक्वारंटाईन व्यक्ती घरात राहणेबाबत परिसरातील व्यक्तीने लक्ष ठेवावे. विनामास्क आढळल्यास दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल, परिसरातील कुठलीही खासगी टॅक्सी, रिक्षा यावरून प्रवासी वाहतूक करणार नाहीत. कासारे गावातील लॉकडाऊन ८ एप्रिल संध्याकाळी ७ ते १८ एप्रिल सकाळी ७पर्यंत दहा दिवसांचा लॉकडाऊन राहील. दुसरा लॉकडाऊन २० ते २८ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळपर्यंत म्हणजे आठ दिवसांचा राहील.

ग्राम विकास अधिकारी अनिल तोरवणे, पोलीस पाटील दीपक काकुस्ते यांनी गावातील मास्क नसलेल्या व्यक्तींना मास्क लावणेबाबत सूचित करण्याची सूचना केली. बैठकीचे प्रास्ताविक प्रा. युवराज काकुस्ते यांनी केले.