शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 20:18 IST

काळखेडा शिवार, शेलबारी घाटातील घटना

धुळे : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर काळखेडा शिवारात झालेल्या बस- दुचाकीची धडकेत एक तर पिंपळनेरनजीक शेलबारी घाटात ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत आणखी एक असे दोनजण ठार झाल्याची घटना घडली. दोन्ही अपघाताच्या घटनेनंतर चालकाने पळ काढला आहे. दोन्ही अपघाताची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे.

काळखेडा शिवारास बसच्या धडकेत एकजण ठार

भुसावळकडून वसईच्या दिशेने जाणारी राज्य परिवहन महामंडळाची एमएच १४ -बीटी ३९८८ क्रमांकाची बस नागपूर पारोळ्याकडून धुळ्याच्या दिशेने येत होती. त्याचवेळेसे समोरुन येणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच १८ एएस ५०९२ ) बसने जोरदार धडक दिली. या अपघातात शरद पंडित बोरसे (कोळी) (४०, रा. बाळापूर, ता. धुळे) हा तरुण जागीच ठार झाला. अपघाताची ही घटना फागणे ते मुकटी दरम्यान काळखेडा शिवारात रविवारी सकाळी साडेनऊ ते पावणे दहा वाजेच्या सुमारास घडला. अपघातानंतर बसचालकाने पळ काढला. घटना लक्षात येताच गंभीर जखमी अवस्थेत शरद बोरसे याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. मयत झालेला शरद बोरसे हा खासगी ठेकेदाराकडे काम करायचा. सुवालाल पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली.

शेलबारी घाटातील घटना

ताहाराबादकडून पिंपळनेर गावाकडे येणाऱ्या दुचाकीला सटाणा रोडवरील शेलबारी घाटात ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली. ही घटना शुक्रवारी ६ वाजेच्या सुमारास घडली. यात बापू सुभाष गायकवाड (३९) आणि बाळू गोविंदा बागुल (२३) या दोघांना दुखापत झाली. त्यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बापू गायकवाड यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात सुरूपसिंग मोतीराम चौरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपघाताची नोंद करण्यात आली.