शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा पोलीस ठाण्यातील जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 12:28 IST

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने दोन गटात धुमश्चक्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल, पोलीस बंदोबस्त वाढविला

धुळे : अल्पवयीन मुलीची छेड काढलेल्या संशयित आरोपींच्या समर्थकांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यावर दगडफेक करीत पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली़ हिंसक झालेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षकाने केलेल्या गोळीबारात दोन जखमी झाले आहेत़ तर जमावाच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस जखमी झाले़ या गोळीबारातील जखमींना पाहण्यासाठी रुग्णालयात दोन जमाव समोरासमोर आले़ येथे झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला़ या घटनेमुळे दोंडाईचा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़दोंडाईचा येथील एका अल्पवयीन मुलीची छेड दोन मुलांनी काढली़ हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या भावाला सांगितला़ त्याने छेड काढणाºया दोघा मुलांना चांगलाच चोप दिला़ दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोक्सो कायद्यान्वये दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते़ याच दरम्यान, संशयित आरोपींचे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात आले़ जमावाने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व अन्य कर्मचाऱ्यांवर दडपण आणून हुज्जत घालण्यास सुरुवात केली़ यावेळी दोंडाईचा पोलीस ठाण्यात मोजकेच कर्मचारी उपस्थित होते़ जमावाला अटकाव करताना काही वेळातच हा वाद हाताबाहेर गेला़ जमावाने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व कर्मचाºयांवर हल्ला केला़ त्यामुळे ज्ञानेश्वर वारे यांनी त्यांच्या पिस्तुलातून गोळीबार केला़ यात दोघे जण जखमी झाले़ गोळीबारामुळे जमाव पोलीस ठाण्याच्या परिसरातून पळाला़ या हाणामारीत वारे यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले़पोलिसांनी केलेल्या गोळीबारातील जखमींना दोंडाईचा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्या ठिकाणी पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणारा मोठा गट पुन्हा आला़ या जमावाने पुन्हा रुग्णालयात धुडगूस घातला़ या दवाखान्यात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असल्याने त्यांना बाधितांच्या नातेवाईकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले़ काहीवेळातच पुन्हा एकदा दोन गटात हाणामारी सुरु झाली़ यामध्ये दोंडाईचा येथील एक तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला़या घटनेची माहिती कळताच नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे घटनास्थळी दाखल झाले आहेत़ याप्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु झाले आहे़ पोलीस ठाण्यासह रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे