शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

कचराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

धुळे : येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कचऱ्याचा प्रश्न पुन्हा पेटला. कचरा संकलनामध्ये वाॅटरग्रेस कंपनी असमर्थ ठरल्याने ठेका रिलायबलला ...

धुळे : येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कचऱ्याचा प्रश्न पुन्हा पेटला. कचरा संकलनामध्ये वाॅटरग्रेस कंपनी असमर्थ ठरल्याने ठेका रिलायबलला देण्याचे ठरले. मात्र, रिलायबलने ऐनवेळी नकार देत महापालिका प्रशासनाला तोंडघशी पाडले. हाच मुद्दा धरून सदस्यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. सभापती सुनील बैसाणे यांनीदेखील शंका उपस्थित केल्याने हा मुद्दा वादाचा ठरला. येथील महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक सभापती सुनील बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सहायक आयुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

स्थायी समितीच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे वॉटरग्रेस आणि रिलायबल या दोन कंपन्यांभोवती चर्चा फिरली. माजी सभापती युवराज पाटील यांनी कचऱ्याचा प्रश्न मांडला. ते म्हणाले, शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. जनता आता आमच्या दारापुढे कचरा टाकू लागले आहेत. अमोल मासुळे म्हणाले, वॉटरग्रेसचे काम योग्य नसल्याने त्या कंपनीला काळ्या यादीत टाकले जाणार होते. मात्र, त्यांनी कार्यमुक्ती मागितल्याने ब्लॅकलिस्टेड केले गेले नाही. वॉटरग्रेस डच्चू देत रिलायबलला काम दिले जाणार होते. मात्र, या कंपनीने काम सुरू करण्यापूर्वीच नकार का दिला. प्रशासन वॉटरग्रेसला पाठीशी घालत आहे का, असा सवालही त्यांनी केला. नगरसेवक संतोष खताळ म्हणाले, वॉटरग्रेसवर कारवाई न करू शकणे म्हणजेच महापालिकेची नामुष्की आहे. यातून प्रशासन हतबल दिसत आहे. वॉटरग्रेसच्या भरवशावर कचरा संकलनाचे काम कसे होणार, नागरिकांना सुविधा मिळत नाही, वॉटरग्रेसचा मनमानी कारभार यापुढे सहन केला जाईल का, असा सवालही उपस्थित केला. सभापती बैसाणे यांनीदेखील वॉटरग्रेस कंपनीवर टीकेचे बाण सोडत काम न करता बिल कसे अदा केले गेले, असा सवाल उपस्थित केला.

कमलेश देवरे यांनी देवपुरातील रस्त्यांच्या समस्यांबाबत पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित केला. भूमिगत गटारीसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, रस्त्यांची कामे झालेली नाहीत. आता ठेकेदारावर कोणती कारवाई होईल, असा सवाल उपस्थित केला. यावर अभियंता शिंदे म्हणाले, भूमिगत गटारीचे काम समाधानकारक नाही. त्यांच्याकडे पुन्हा तक्रार केली जाईल. त्यांनी ऐकले नाही, तर शेवटी निविदा रद्द करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.