शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील ६५० विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्याची संधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:56 IST

६५ शाळांमधून होणार विद्यार्थ्यांची निवड : पालकांचे संमतीपत्र घेणार

आॅनलाइन लोकमतधुळे :शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ६५ गुणवत्तापूर्ण शाळांमधून ६५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विविधांगी ज्ञानवर्धक स्थळांना भेटी देण्याची संधी मिळेल.स्थानिक स्वराज्य संस्थांसह शासकीय शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना राज्यांतर्गत असलेल्या नामांकित शैक्षणिक संस्था, शाळा, ऐतिहासिक स्थळ, वैज्ञानिक केंद्र, वस्तू संग्रहालय, प्राणी संग्रहालय, तारांगण, अभयाराण्य,आदी ठिकाणी भेट देता येणार आहे. त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया उच्च प्राथमिक शाळांची निवड करण्यात येईल. या शाळा शाळा सिध्दीत उपक्रमात ‘अ’ गटात असाव्यात. तसेच मागील दोन ते तीन वर्षांत शाळा शंभर टक्के प्रगत असावी, शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविलेले असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातून ६५ शाळा व प्रत्येक शाळेतून दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.तीस विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाचा समावेश असेल. निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३० ते ४० विद्यार्थ्यांचा एक गट असेल.या गटाची जबाबदारी एका शिक्षकावर असेल. अभियानांतर्गत अभ्यास दौºयासाठी जाणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र घेण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी १ लाख ३० हजार रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण