शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. संकट खूप मोठे आहे. सध्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोना व्हायरस हा दहा ...

कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. संकट खूप मोठे आहे. सध्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोना व्हायरस हा दहा पटीने पसरत असल्यामुळे सर्वदूर कोरोनाचा हाहाकार माजला आहे. गावात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. गावातील जि.प. व खासगी शाळेतील शिक्षक व आशा सेविका गावात कोरोनाबाधितांचा सर्व्हे करीत आहेत. मात्र नागरिक खरी माहिती लपवित आहे. ग्रामपंचायत सदस्य आपापल्या वॉर्डांत त्यांच्या सोबत राहिले तर ही मोहीम अधिक परिमाणकारक होईल.

जनतेच्या मनात लसीकरणाबाबत गैरसमज मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. लस दिल्यानंतर कोरोना होतो. ताप ,अंगदुखी, अशक्तपणा येतो. मृत्यू येतो. अशा गैरसमजातून जनतेच्या मनात भीती वाढत असल्याने लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. ज्या दिवशी लस असते त्या दिवशी अनेक जण भीतीने शेतातील झाडाखाली जाऊन बसतात . याउलट शहरातील लसीकरण केंद्रात लसीकरणासाठी गर्दी दिसून येते. केंद्रात लसींचा तुटवडा असल्यामुळे पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची फरफट होत आहे. मात्र गावातील मजूरवर्ग नागरिकांनी गावातल्या आरोग्य केंद्राकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते.

सध्या कोरोनावर औषध उपलब्ध नाही. लसही आपल्यासाठी संजीवनी आहे. लस व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशी जनजागृती माजी उपसरपंच प्रतापराव माळी करीत आहेत.

कोरोना संकटकाळात गावातील नागरिकांची जबाबदारी सरपंच, सर्व सदस्य व ग्राम दक्षता समितीची असली तरी प्रशासकीय यंत्रणा, ग्रामसेवक, तलाठी, पोलीसपाटील, गटविकासाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, तरुण सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी एकत्रित संवाद साधून योग्य नियोजन व अंमलबजावणी केल्यास व लसीबाबत गैरसमज दूर केल्यास कोरोना वर मात करता येईल.

या महिन्यात नियमित लसीकरण सुरू आहे . केंद्रावर गर्दी न करता नियम पाळून लसीकरण सुरू आहे. सुमारे ४०० लोकांनी लस घेतली असून, कोणालाही त्रास झाला नसल्याचे परिचारिका दीपाली मैत्रे यांनी सांगितले.

फोटो : फोन करून प्रोत्साहन दिल्यावर लसीकरणासाठी आलेले ग्रामस्थ.