शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कचऱ्याचे वर्गीकरण नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 22:23 IST

घंटागाड्याही नियमीत येईनात

धुळे : शहरातील कचऱ्याच्या वर्गीकरणाकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आता होऊ लागली आहे. शहरातील विविध भागातील कचरा संकलित करण्याचा ठेका वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. शासनाने ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, या निर्देशांचे ठेकेदारातर्फे अनेकवेळा पालन केले जात नाही. त्याचबरोबर अनेक भागात घंटागाडीही वेळेवर येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याची स्थिती आहे. शहरातील विविध भागात जमा होणारा कचरा रोज संकलित झाला पाहिजे. डेपोत टाकला गेला पाहिजे. मात्र, अनेकवेळा त्याकडे दुर्लक्ष होते. घंटागाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे आवश्यक आहे. कारण ओल्या कच-यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. तसेच कोरडा कचरा वर्गीकरण करून तो नष्ट करण्यासाठी प्रयत्न होतात; परंतु घंटागाडीत ओला व सुका कचरा एकत्र संकलित केला जातो. घंटागाडीत ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी दोन स्वतंत्र कप्पे असले तरी एकाच कप्प्यात सर्व कचरा टाकला जातो. तसेच अनेक भागात घंडागाडी तीन ते चार दिवसांनी येते. नागरिकांना ओला कचरा तीन ते चार दिवस सांभाळून ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिक हा कचरा सरळ नाला किंवा कचराकुंडीत फेकून देतात. या गंभीर प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये मनपा स्थायी समिती सभापतींनी देखील कचरा संकलनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. घंटागाड्या नियमीत येत नसताना लाखोंची बिले कशी अदा केली जातात, अशा शब्दात त्यांनी कचरा संकलनाचा देखावा उघड केला.शहरातील कचराकुंड्या देखील पूर्ण भरलेल्या असतात. कुंड्यांच्या बाजुला रस्त्यावर कचरा साचतो. दुर्गंधी पसरते. परंतु नियमीत कचरा उचलला जात नाही. लाखो रुपयांचा ठेका देवून देखील धुळे शहराची कचरा संकलनाचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही. नागरिकांना दोन ते तीन दिवस कंचरा घरातच ठेवावा लागतो. ही समस्या गंभीर आहे.

टॅग्स :Dhuleधुळे