शिक्षकांनी संवाद कौशल्य विकसीत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 11:36 IST2019-09-25T11:36:15+5:302019-09-25T11:36:32+5:30
अरूण साळुंके : पाटील महाविद्यालयात प्राथमिक शिक्षकांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा

शिक्षकांनी संवाद कौशल्य विकसीत करावी
आॅनलाइन लोकमत
धुळे : स्पर्धेच्या युगात व्यावसायिक, वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिकस्तरावर संवाद व व्यवस्थापन कौशल्ये यांची आवश्यकता आहे. शिक्षकांनी आपल्या नियमित अध्यापनाबरोबरच संवाद व व्यवस्थापन कौशल्ये समृध्द करणे गरजचे आहे असे प्रतिपादन जयहिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉ. अरुण साळुंके यांनी केले.
झेड.बी.पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे संभाषण, सादरीकरण, व्यवस्थापन व अभिप्राय कौशल्ये समृध्द होण्यात शिक्षकांचा सक्रीय सहभाग असावा या उद्देशाने प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी कौशल्य विकास या विषयांवर ७ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी डॉ. साळुंके बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समिती चेअरमन सुधीर पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, संचालक शेखर सूर्यवंशी, डॉ.अनिल चौधरी, प्राचार्य डॉ. पी.एच. पवार, उपप्राचार्य डॉ. ए.ए. पाटील, उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे, उपप्राचार्या डॉ. विद्या पाटील उपस्थित होते.
डॉ. अरुण साळुंके पुढे म्हणाले आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी इंग्रजी या भाषेत संवाद कौशल्ये, संप्रेषण कौशल्ये विकसित होणे आवश्यक आहे.
प्रा.सुधीर पाटील म्हणाले की अचूक इंग्रजी बोलण्याची गरज तसेच माहिती संप्रेषण ही एक कला आहे. प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.वर्षा पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा. अश्विनी जोशी यांनी केले.