शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे पगार उशिराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST

धुळे : मुंबईसह राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार या महिन्यातही अजून झालेले नाहीत. फेब्रुवारी पेड इन मार्चचे पगार तब्बल एक ...

धुळे : मुंबईसह राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार या महिन्यातही अजून झालेले नाहीत. फेब्रुवारी पेड इन मार्चचे पगार तब्बल एक महिन्याने मिळाले, तर मार्च पेड इन एप्रिलचे पगार दुसरा आठवडा उजाडला तरी अद्याप झालेले नाहीत. केवळ शिक्षण विभागातील दिरंगाईमुळेच हे घडत असल्याचे वित्त विभागाकडून सांगण्यात येत आहे.

कोविडमुळे निधी वितरण दर महिन्याला मागणीनुसार होत आहे. पगाराची सर्व रक्कम खात्याने वेळीच मागितली पाहिजे. मात्र, शिक्षण विभागाकडून असे होताना दिसत नाही. परिणामी त्याचा भुर्दंड शिक्षकांना सहन करावा लागतो, अशी तक्रार शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केली आहे.

पगार उशिरा झाल्यामुळे गृह कर्जाचे हप्ते, इतर हप्ते आणि दैनंदिन खर्च भागवणे मुश्किल होते. तसेच हप्ते चुकल्यामुळे दंड सहन करावा लागतो, असेही मोरे यांनी म्हटले आहे.

याबाबत आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र पाठवले आहे.

शिक्षण विभागाचे सचिवालय राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांच्या पगाराबाबतीत गंभीर नसल्यामुळेच दर महिन्याला पगार उशिरा होत आहे, असा आरोप आमदार कपिल पाटील यांनी पत्रात केला आहे.

मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार युनियन बँकेतून करण्याबाबत सुप्रिम कोर्टाच्या आदेशाची अमंलबजावणी अद्याप झालेली नाही. दोन वर्ष होऊनही करारनामा पुनर्स्थापित करण्यात आलेला नाही. त्यामुळे युनियन बँकेला पगार वितरणामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, असेही कपिल पाटील यांनी पत्रात म्हटले आहे, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक, धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दिली आहे.