शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

फक्त दोन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांसह धरणेही तुडुंब भरलेली आहे. याचा परिणाम पाणीटंचाई ...

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांसह धरणेही तुडुंब भरलेली आहे. याचा परिणाम पाणीटंचाई मुक्ततेवर झालेली आहे.

२०१९च्या मे महिन्यात जिल्ह्यातील १२४ गावांसाठी तब्बल ८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, या वर्षी दिलासादायक स्थिती आहे. मे, २०२१च्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात फक्त दोन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात शिंदखेडा तालुक्यातील कामपूर व साक्री तालुक्यातील मळगाव डोमकाणे या दोन गावांचा समावेश आहे. दरवर्षी शिंदखेडा तालुक्याला पाणीटंचाईची सर्वाधिक झळ सोसावी लागते. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे अमरावती प्रकल्प, वाडीशेवाळी धरण भरलेले असल्याने, या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न काहीसा मिटलेला आहे.

२९ विहिरी अधिग्रहित

२०१९ मध्ये टँकरप्रमाणेच तब्बल २५० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र, या वर्षी फक्त २९ गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. यात शिंदखेडा तालुक्यात ८, शिरपूर तालुक्यात ३, धुळे तालुक्यात ७ व साक्री तालुक्यात ११ विहिरींचा समावेश आहे. दरम्यान, अजून काही गावांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यामुळे जूनपर्यंत आणखी २०-२५ विहिरी अधिग्रहित कराव्या लागतील.

पाण्यासाठी भटकंती संपली

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात स्त्री-पुरुषांना आपले कामेधंदे सोडून तळपत्या उन्हात, रात्री केव्हाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र अनेक गावांमध्ये बघावयास मिळत होते. मात्र, या वर्षी ती परिस्थिती अजिबात नाही. काही गावांना पाणीपुरवठा उशिरा होत असला, तरी टंचाई मात्र नाही.