शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरग्रस्त शेतकऱ्यांवरील गुन्हा मागे घ्या, अन्यथा आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

शिंदखेडा तालुक्यातील वरूळ गावातील शेतकरी प्रकाश पीतांबर पाटील यांनी अनधिकृत बियाणे साठवणूक केल्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाने शिंदखेडा पोलीस ...

शिंदखेडा तालुक्यातील वरूळ गावातील शेतकरी प्रकाश पीतांबर पाटील यांनी अनधिकृत बियाणे साठवणूक केल्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाने शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. तसेच शेतकरी प्रकाश पाटील कॅन्सरग्रस्त आहे. सदर शेतकऱ्याने कोणासही माल विकलेला नसून स्वतःच्या शेतीसाठी बियाणे आणले होते. वास्तविक कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानावर गुन्हा न दाखल करण्याची गरज होती. मात्र गरीब शेतकऱ्यावर चुकीचा गुन्हा दाखल करून शेतकरी कुटुंबावर अन्याय केला आहे. सदर शेतकऱ्यास उच्च न्यायालयापर्यंत जाऊन दाद मागून जामीन घ्यावा लागला आहे. शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करणेबाबत कोणताही शासनाचा नियम नसताना चुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषदेच्या सभेत हा विषय चर्चेला घेतलेला असताना अद्याप गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही. सदरील गुन्हा १४ ऑगस्टअखेर मागे न घेतल्यास गावातील व तालुक्यातील शेतकऱ्यांसह १५ ऑगस्ट रोजी जि.प. प्रांगणात मोर्चा काढून उपोषणास बसणार, असा इशारा जि.प. सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी दिला आहे.