शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची धामधूम असतानाच आत्महत्येमुळे दु:खाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडजाई : अवघ्या तीन दिवसांवर बहिणीचे लग्न असतानाच होमगार्डमध्ये कार्यरत असलेल्या भावाने विष घेऊन आत्महत्या केल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कवडजाई : अवघ्या तीन दिवसांवर बहिणीचे लग्न असतानाच होमगार्डमध्ये कार्यरत असलेल्या भावाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना धुळे तालुक्यातील वडजाई गावात शनिवारी दुपारी घडली़ रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़ एकीकडे घरात लग्नाची धामधूम सुरु असतानाच आत्महत्येच्या घटनेमुळे दु:खाचे सावट कोसळले़वडजाई येथील शेतकरी नंदलाल पुंजू सुर्यवंशी हे शेती व्यवसाय करतात त्यांना कपिल (सोनु) व कविता अशी दोन मुले आहेत. कपिल हा शिक्षण घेत होता़ शिक्षण घेत असतानाच तो होमगार्डमध्ये भरती झाला होता़ सुटीच्या दिवशी तो शेतात वडिलांना सर्वोतोपरी शेती कामांमध्ये मदत करीत असे़ नंदलाल सुर्यवंशी हे शेती व्यवसाय करुन परिवाराचा उदरनिर्वाह करित गरीब परिस्थितीशी झुंज देत आपला परिवार सांभाळत होते. त्यांची एकुलती एक मुलगी कविता हिचा विवाह येत्या १२ मार्च रोजी वडजाई गावात होणार होता़ लग्नपत्रिका वाटपासह विवाहाची संपूर्ण तयारी पुर्णत्वास आली होती. लग्न सोहळा असल्याने जवळीचे वºहाडी येण्यास सुरुवात झाली असतानाच ‘लग्नासाठी कपडे नंतर घे’ असे वडीलांनी सांगितल्याचा राग आल्याच्या क्षुल्लक कारणावरुन कपिलने आत्महत्या केल्याने घरातील सर्वच सुन्न झाले आहेत़१२ मार्च रोजी कविताचे लग्न आहे़ त्याची धामधूम घरी सुरु झाली आहे़ त्यातच ही दुर्घटना घडल्यामुळे गावात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ रविवारी सायंकाळी ५ वाजता कपिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले़ शोकाकूल वातावरण आहे़

टॅग्स :Dhuleधुळे