शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींचा पोलीस ठाण्यात ‘ठिय्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:36 IST

बसप्रवासात टोमणे, छेडखानी : जबाबदार असलेल्या मुलांसह त्यांच्या पालकांना बोलवून तंबी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील टेंभे बु़ येथील शाळकरी मुले बसमध्ये मुलींची छेडछाड करून गैरवर्तन करतात, अश्लिल भाषेत मुलींना टोमणे मारतात या त्रासाला कंटाळून भरवाडे येथील  ४०-५० शाळकरी मुलींनी सकाळी ९ ते दुपारी १़३० वाजेपर्यंत शिरपूर पोलिस ठाण्याच्या आवारात बसून होते़ अखेर पोनि शिवाजी बुधवंत यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मुली गावी परतल्यात़२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून भरवाडे गावातील शाळकरी मुलींसह त्यांचे पालक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेत़ मात्र तत्पूर्वी, पोनि शिवाजी बुधवंत हे नरडाणा येथे बंदोबस्तकामी रवाना झाल्यामुळे तोपर्यंत त्या मुली पोलिस ठाण्याच्या प्रांगणात एका लिंबाच्या झाडाखाली बसून होते़ तेथेच त्यांना नाश्ता म्हणून पोहे देण्यात आले़ भरवाडे येथील शाळकरी मुले-मुली टेकवाडे-शिरपूर बसने अर्थे गावी शिक्षणासाठी ये-जा करतात़ या बसमध्ये टेंभे बु़ येथील मुले-मुली देखील शिक्षणासाठी अर्थे गावी जात असतात़ दरम्यान, टेंभे बु़ येथील काही शाळकरीत मुले भरवाडे येथील मुलींची छेडछाड करतात, त्यांच्याशी गैरवर्तन करून अश्लिल भाषेत टोमणे मारतात असे प्रकार वारंवार घडत होते़२३ रोजी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास सुध्दा भरवाडे येथील मुली अर्थे गावी जाण्यासाठी बसमध्ये बसले असतांना ते मुले छेडछाड करून अश्लिल हावभाव करून त्रास देत होते़ सदरची बाब मुलींच्या पालकांना कळताच त्यांनी धाव घेतली़ त्यांच्यात वाद देखील झाला़ दरम्यान, टेंभे बु़ येथील काही तरूणांनी या संदर्भात पोलिस ठाण्यात अर्ज दिला़ त्याची काणकूण त्या मुलींच्या पालकांना कळाली़वारंवार त्रासाला कंटाळून २४ रोजी भरवाडे गावातील ४०-५० मुलींनी सकाळी शाळेत न जाता थेट पोलिस ठाणे गाठून ठिय्या आंदोलन केले़ दरम्यान, पोनि बुधवंत हे पोलिस बंदोबस्तकामी नरडाणा येथे गेल्यामुळे या मुलींची आपबिती कुणीच ऐकून घ्यायाला तयार नव्हते़ त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारातील एका लिंबाच्या झाडाखाली बसून राहीलेत़ दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्या मुलींना भुक लागल्यामुळे नाश्ताची सोय केली़दुपारी १़३० वाजेच्या सुमारास पोनि बुधवंत आल्यानंतर त्यांनी मुलींची आपबिती ऐकून घेतल्यानंतर त्या मुलांसह त्यांच्या पालकांना देखील पोलीस ठाण्यात बोलावून खडसावले तसेच चांगलेच फैलावर घेतले. 

टॅग्स :Dhuleधुळे