ऑनलाईन लोकमत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}धुळे,दि.29 - दारू पिण्यास मनाई केल्याने एकाला कु:हाडीने मारहाण करून जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री निमझरी (ता़ शिरपूर) येथे घडली आह़े याप्रकरणी एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील सुतार पावरा (रा़ निमझरी) असे जखमीचे नाव आह़े त्यांनी सोमवारी रात्री 8़30 वाजेच्या सुमारास निमझरी गाव शिवारातील तुषार सुधाकर पाटील यांच्या शेतात रूपसिंग गोमा पावरा (रा. टाक्यापाणी ता.शिरपूर, ह. मु. निमझरी ता. शिरपूर) याला दारू पिण्यास मनाई केली. त्यावरून त्याने सुनील पावरा यांना शिवीगाळ, दमदाटी करीत हातातील कु:हाडीने मारल़े, त्यात ते जखमी झाल़े