शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पोलिसांची बदनामी सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 22:01 IST

कुणाल पाटील : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घेतली भेट

धुळे :  महाराष्ट्रासह मुंबई पोलिसांची बदनामी कधीही सहन केली जाणार नाही. काही ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विरोधी पक्ष पोलिसांना बदनाम करुन त्यांचे मनोबल कमकुवत करण्याचे काम करीत आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी समर्पण भावनेने, निस्वार्थपणे जीवाची बाजी लावून मुंबईचे रक्षण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे संकटसमयी काँग्रेस पक्ष पोलीस दलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याच्या भावना महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळाने व्यक्त केल्या.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप केले आहेत.  महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सत्तेच्या लालसेपोटी परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम चालविले आहे. काँग्रेस शिष्टमंडळाने सांगितले की, मुंबई पोलिसांचा जगात नावलौकिक आहे. मुंबईतील बॉम्बस्फोट, मुंबईवर झालेला २६/११चा दहशतवादी हल्ला, अतिवृष्टीतील नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनासारख्या जागतिक संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता  मुंबई आणि मुंबईकरांचे निस्वार्थीपणे रक्षण केले आहे. पोलीस दलाच्या या शौर्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मात्र, विरोधी पक्ष काही ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्तेसाठी पोलीस दलाला बदनाम करण्याचे काम करीत आहे. पोलीस दल आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा विरोधकांचा शकुनी डाव काँग्रेस पक्ष हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि पोलीस दलाचा नावलौकीक जपण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच तत्पर असेल, अशी ग्वाही यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिष्टमंडळाने दिली.

टॅग्स :Dhuleधुळे