शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर पथके रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 9:35 PM

जिल्हाधिकारी यांची माहिती

धुळे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान पथके मतदान साहित्यासह आपापल्या मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी रवाना झाले. या निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीसाठी तयारी पूर्णत्वास आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्र असतील. एकूण दहा मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी मतदान पथके रवाना झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन भवनातून या मतदान पथकांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.या मतदान पथकांमध्ये मतदान केंद्रांध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन, तीन, शिपाई आणि बंदोबस्तासाठी एका पोलिसाचा समावेश आहे. एकूण दहा पथके असून एक पथक राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. प्रत्येक मतदान पथकाजवळ सॅनेटायझर, मास्क, ग्लोव्हज, थर्मल गन, आॅक्सीमीटर, फेस शील्ड देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी व दोन सहाय्यकांचा समावेश आहे.

टॅग्स :Dhuleधुळे