शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

धुळे जिल्ह्यात डिजिटल शाळांना सौरउर्जेची झळाळी, ४० शाळांच्या स्वयंपूर्णतेला लोकसहभागाची जोड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2018 7:51 AM

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ‘डिजिटल’ करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग धुळे जिल्ह्यात राबविण्यात आला. लोकसहभागामुळे हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. आता जिल्ह्यातील दुर्गम भागातील काही शाळांपर्यंत वीज पोहचलेली नाही, अशा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोलरकीट बसविण्यात येत आहे. सौरउर्जेमुळे शाळा झळाळणार आहेत.

धुळे - जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ‘डिजिटल’ करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग धुळे जिल्ह्यात राबविण्यात आला. लोकसहभागामुळे हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. आता जिल्ह्यातील दुर्गम भागातील काही शाळांपर्यंत वीज पोहचलेली नाही, अशा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोलरकीट बसविण्यात येत आहे. सौरउर्जेमुळे शाळा झळाळणार आहेत.देशात आता ‘डिजिटल क्रांती’ सुरू आहे. त्यात आता शाळाही मागे नाहीत. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यालाही तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण मिळावे यासाठी धुळे जिल्ह्यात ‘डिजिटल शाळांचा’ प्रयोग यशस्वी झाला. ‘डिजिटल शाळेचे’ प्रणेते हर्षल विभांडिक व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या गावांपासून तर अगदी झोपडपट्टीत भरणाºया शाळाही ‘डिजिटल’ झाल्या. संपूर्ण ११०३ जि.प.शाळा १८ महिन्यांच्या कालावधित ‘डिजिटल’ झाल्या. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात धुळ्याचे नाव सुवर्णक्षरांनी नोंदविले गेले. या प्रयोगाला लोकसहभागाची जोड मिळाली.विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाबरोबरच ज्ञानरचनावादी शिक्षणही मिळू लागले. जिल्हा परिषदेच्या शाळांनी टाकलेली ‘कात’ बघून पुन्हा प्रवेश घेणा-यांचा ओढा वाढला. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांनी ‘इंग्रजी’ला गुडबाय करून जि.प.शाळेत ‘वापसी’ केली. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ६६९ विद्यार्थी जि.प. शाळांकडे परतले आहेत.शाळा डिजिटल झाल्या खºया, मात्र दुर्गम भागात विजेचा प्रश्न होता. काही भागात वीज पोहचलेली नाही, काही ठिकाणी शाळेच्या वेळेतच भारनियमन होत होते. काही ठिकाणी शाळेचा वीज पुरवठा थकीत बिलामुळे खंडित करण्यात आलेला. त्यामुळे शाळा डिजिटल असूनही काहीच उपयोग होत नव्हता. ही समस्या साक्री व शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर आहे. विजेची समस्या कायमस्वरूपी सोडण्यासाठी जि.प.च्या शाळांमध्ये सौर उर्जेचे पॅनल बसविण्याचा निर्णय झाला आहे. यानुसार साक्री तालुक्यातील जवळपास ४० शाळांमध्ये सोलर कीट बसवून त्या विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यात आल्या आहेत. यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सहकार्य लाभले.आदिवासी दुर्गम भागातील ज्या शाळांपर्यंत वीज पोहचलेली नाही, अथवा ज्यांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे, या शाळांमध्येही राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांच्या सीएसआर फंडातून सोलर कीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शाळा विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण व्हाव्या, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन व शिक्षणाधिकारी मोहन देसले, डिजिटल शाळेचे प्रणेते हर्षल विभांडिक यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. ज्या भागातील शाळांमध्ये विजेची अडचण आहे, त्याठिकाणी सोलर पॅनल बसविण्यात येत आहे. आतापर्यंत ४० शाळांमध्ये या पद्धतीने सोलर पॅनल बसविण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सोलर पॅनल बसवून, शाळा विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.मोहन देसले,शिक्षणाधिकारी (प्राथमिक)जिल्हा परिषद, धुळे 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र