मालपूर लसीकरण केंद्रावर लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:32+5:302021-05-09T04:37:32+5:30

मालपूर येथे ८ मार्चपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला याला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र ...

Shortage of vaccine at Malpur Vaccination Center | मालपूर लसीकरण केंद्रावर लसीचा तुटवडा

मालपूर लसीकरण केंद्रावर लसीचा तुटवडा

Next

मालपूर येथे ८ मार्चपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला याला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र नंतर नागरिक स्वतः येथे येऊन लसीकरण करून घेत आहेत. दरम्यान लसीचा मुबलक साठा उपलब्ध आहे. असे देखील सांगण्यात आले व शुक्रवारी येथे ग्रामस्थ लसीकरणासाठी गेले असता लस संपल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी स्वतःहून आपापल्या कुटुंबातील ४५ वर्षावरील तसेच मधुमेह, कॅन्सर, किडनी किंवा दुर्धर आजार असणाऱ्या सदस्याला लसीकरण करून घ्यायला सुरुवात केली आहे.

मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध होता. आतापर्यंत..... नागरिकांचेच लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले. आहे सकाळी ९ ते सायंकाळी ५ ह्या वेळेत लसीकरण करण्यात येते. याला नागरिकांचा आता हळूहळू प्रतिसाद लाभत असून यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत गावात घट दिसून येत आहे. लसीकरणामुळे अद्याप कोणताही त्रास दिसून आला नसून पूर्णपणे सुरक्षित असल्याचे येथील चित्र आहे. नागरिकांनी स्वतःहून घराबाहेर पडून लसीकरण करून घ्यायला सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाने त्वरित येथे लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा, व तुटवडा भासणार नाही याचे नियोजन करावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला मालपूर सह सुराय, कर्ले, परसोळे, कलवाडे, अक्कलकोस, चुडाणे, देवी, रेवाडी, वाडी, रुदाणे, देवकानगर आदी १२ गावे जोडली असून या गावात जाऊन लसीकरण कॅम्प लावून लसीकरण होणे आवश्यक आहे तरच आपण कोरोनावर विजय मिळवणार आहोत. मात्र तसे होतांना दिसून येत नाही.

Web Title: Shortage of vaccine at Malpur Vaccination Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.