शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शिरपूरला गव्हाची १२०० क्विंटल आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 1:11 PM

बाजार समिती : खरेदी, विक्री पुन्हा सुरू, शेतकऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे खान्देशातील भुसार माल खरेदी-विक्रीत अव्वल असणारी मार्केट कमिटी देखील बंद होती़ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली़ तत्पूर्वी, मार्केट आवारातील शेतकºयांची थर्मल स्कॅनिंग करण्यात आली़ पहिल्याच दिवशी १७० वाहनांची मोजणी करून दररोज १५० वाहनांची मोजमाप केले जाणार आहे़ गहू व दादरची आवक मोठी होती़देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे़ सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे़ रब्बी हंगाम सुरू झाल्यामुळे शेतमालाची आवक वाढली आहे़ त्यामुळे शेतकरी देखील येथील बाजारपेठ बंद असल्यामुळे अन्य मार्केटला नेत होता़ अशा स्थितीत अन्नधान्याचा तुटवडा पडू नये़ शेतकºयांची आर्थिक परवड दूर व्हावी म्हणून जिल्हाधिकाºयांनी देखील मार्केट पुर्ववत सुरू करण्याच्या सूचना दिल्यात़ मार्केट प्रशासन व व्यापाºयांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत रोज १५० वाहनाची मोजमाप करण्याचे धोरण ठरले़७ रोजी येथील मार्केट पूर्ववत सुरू झाले़ शेतकºयांनी सकाळपासून मार्केट बाहेर वाहनांची मोठी गर्दी केली़ सध्या लॉकडाऊन असल्यामुळे शेतमालाचे वाहने मार्केट आवाराच्या बाहेरच लावण्यात आली होती़ एकावेळी ५ वाहनांना मार्केटमध्ये सोडले जात होते़ तत्पूर्वी, आलेल्या शेतकºयांना मास्कचे वाटप मार्केट प्रशासनाकडून करण्यात आले़ तसेच आलेल्या शेतकºयांच्या हातावर सॅनेटायझर व हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याची सुविधा करण्यात आली होती़ नगरपालिका प्रशासनाकडून सुध्दा मार्केट आवारात फवारणी केली जात होती़ व्यापाºयांनी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत १३० वाहनांची तर दुपारी ४ वाजेनंतर उर्वरीत ४० वाहनांचे मोजमाप केले़मार्केट बंदमुळे मोठ्या प्रमाणावर आवक वाढली़ शेतकºयांनी एकच गर्दी केल्यामुळे रस्त्यांवर वाहनांची तोबा गर्दी झाली होती़ गव्हाला १६०० ते १९०० रूपये भाव, हरभरा ३८०० ते ४२००, दादर ३५०० ते ४४०० भाव होता़ दिवसभरात गव्हाची आवक १२००-१३०० क्विंटल, हरभरा आवक ८०० ते ९०० क्विंटल तर दादरची आवक १००० ते ११०० क्विंटल होती़येथील उपजिल्हा रूग्णालयातर्फे मार्केट आवारात आलेल्या शेतकºयांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येत होती़ यावेळी मार्केट सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, व्हाईस चेअरमन इशेंद्र कोळी, संचालक अविनाश पाटील, नरेश पाटील, राजेंद्र पाटील, मोहन पाटील, युवराज जैन, शिवाजी वाळूचकर सचिव वसंत बुवा, रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ़धु्रवराज वाघ, डॉ़निकम आदी उपस्थित होते़आतापर्यंत १३०० शेतकºयांनी मार्केटला नोंदणी केली आहे़ दररोज १५० वाहनांची मोजमाप केले जाणार आहे़ मार्केट प्रशासनाकडून वारंवार ध्वनिक्षेपकावरून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन केले जात होते़ शेतमाल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांनी येतांना तोंडाला रूमाल बांधणे तसेच कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात होते़ यावर नोडल अधिकारी लक्ष ठेवून आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे