आणखी सात अहवाल पॉझीटीव्ह -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 19:48 IST2020-06-10T19:45:43+5:302020-06-10T19:48:11+5:30

बाधीत रूग्णांची संख्या ३२५ वर

Seven more positive reports - | आणखी सात अहवाल पॉझीटीव्ह -

dhule

धुळे- येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील ५१ अहवालांपैकी सात अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. धुळे शहरातील पाच तर शिरपुरातील दोन रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या ३२५ वर पोहोचली आहे.  जिल्ह्यातील आणखी दोन रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील एक व शिरपूर येथील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासातच धुळे शहरातील रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच एका महिलेचा जळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या महिलेचाही समावेश जिल्ह्यातील मृतांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २८ वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यातील तीन बाधीत रूग्ण नाशिक येथे उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या ३२५ इतकी झाली आहे.

Web Title: Seven more positive reports -

टॅग्स :Dhuleधुळे