शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१११७ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 22:35 IST

सातवा वेतन आयोग : राज्यातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागु करण्याची प्रक्रिया सुरूवात

धुळे : जिल्हा परिषद, महापालिका, नगर पालिका कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग गतवर्षी लागु केला होता़ या वेतन आयोगाचा लाभ मनपाच्या १ हजार ११७ कर्मचाºयांना होणार आहे़ त्यासाठी शुक्रवारी नगर विकास विभाग मंत्रालयात या कर्मचाºयांची माहिती पाठविण्यात येणार आहे़राज्य सरकारी कर्मचाºयांना १ जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे़ हा वेतन आयोग लागु झाल्यास महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या १ हजार ११७ कर्मचारी तसेच सेवानिवृत झालेल्या कर्मचाºयांना १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ अखेरची सातव्या वेतनाची थकबाकी रक्कम समान पाच हप्यात द्यावी लागणारी आहे़ त्यामुळे दरमहा अंदाजे ७५ लाखांपेक्षा अधिकचा बोजा मनपाच्या तिजोरीवर पडणारा आहे़ यापुर्वी कर्मचाºयांना ५ व ६ वेतनाचा लाभ देतांना मनपाची आर्थिक ओढाताण झाली होती़कार्यरत १११७ कर्मचारीमनपाच्या विविध शाखेतील १ हजार ११७ कर्मचारी कार्यरत आहेत़ त्यात अ गटातील शासन मंजूर पदे ५६ भरलेली पदे १० तसेच रिक्त पदे ४६ आहेत़ ब गटातील शासन मंजूर ३८ , भरलेली ६ रिक्त ३२, क गटात शासन मंजूर ६५६, भरलेली २२४, रिक्त ४३२ तसेच ड वर्गात शासन मंजूर ११२४ भरलेली १११७ तसेच रिक्त पदे ११५७ आहेत़ अशी सध्या २ हजार २७४ शासन मंजूर पदे, १ हजार ११७ भरलेली पदे तर १ हजार १५७ रिक्त पदे आहेत़ त्यापैकी १ हजार ११७ कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त काही कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ यंदा लवकरच दिला जाणारा आहे़कर्मचाºयांची माहिती पाठविलीसातवा वेतन आयोगाचा लागु झाल्यानंतर मनपाला त्या कर्मचाºयांना फरक पाच टप्यात द्यावी लागणार आहे़ त्यासाठी मनपाकडून कार्यपुर्व नियोजन करण्यात आले आहे़ कर्मचाºयांनी संख्या, आस्थापनावर येणारा खर्च, महापालिकेला मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न अशी माहिती देण्यात आली आहे़असा होता कर्मचाºयांवर खर्चमहापालिकेचा आस्थापना एकूण वार्षिक खर्च १४९.१५ कोटी रूपये आहे़ त्यात कर्मचाºयांवर सुमारे ८८.७२ कोटी रूपये वार्षिक खर्च होतो़ तर मालमत्ता कर, मोबाईल टॉवर, वस्तु व सेवा कर तसेच इतर कराव्दारे महसुल सुमारे १७३.६९ कोटी महापालिकेला वार्षिक मिळतो़ त्यामुळे आस्थापना खर्च व मिळणारा महसुलद्वारे पाच टप्यात कर्मचाºयांना फरक देता येईल़

टॅग्स :Dhuleधुळे