शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरुन साक्रीत वृध्दाला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:17 IST

६ जणांविरुध्द गुन्हा, काही काळ होते तणावाचे वातावरण

धुळे : क्षुल्लक कारणावरुन शिवीगाळ करीत घरात घुसून एका वृध्दाला हाताबुक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या वृध्दाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्याने सहा जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली.ट्रॅक्टर घेवून आलेल्या एकाने पाटचारीला लावलेले दगड काढून फेकले. हे दगड का फेकले असे विचारल्याच्या कारणावरुन आलेल्या जमावाकडून हिम्मत संपत पाटील (६६, रा. दिघावे ता. साक्री) यांच्याशी वाद घालण्यात आला. शाब्दीक चकमकीनंतर शिवीगाळ करीत वेळ हाणामारीपर्यंत येवून पोहचली. हाताबुक्याने मारहाण करत असताना त्यांची पत्नी वाचविण्यासाठी आली असता तिला ढकलून देण्यात आले. त्याचवेळेस मोबाईल घेण्यासाठी घरात पाटील हे येताच त्यांच्या पाठोपाठ जमावाने घरात घुसून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करीत दमदाटीही केली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमी झालेल्या हिम्मत पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर हिम्मत संपत पाटील यांनी बुधवारी सायंकाळी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, संशयित बंडू एकनाथ मराठे याच्यासह ६ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.