शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

१६ भाषांमध्ये सहजयोग ध्यान प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 21:54 IST

नवीन वर्षानिमित्त अनोखा उपक्रम

धुळे : सहजयोग सुवर्णजयंती उत्सवानिमित्त संपूर्ण देशात १६ विविध भारतीय भाषांमध्ये सलग १२ तास ऑनलाइन  कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतीचा  कार्यक्रम, निशुल्क प्रशिक्षण रविवारी सकाळी ९  ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक सत्र ४५ मिनिटांचे आहे. श्री माताजी निर्मला देवी सहजयोग ट्रस्ट, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहजयोग ट्रस्ट आणि पुणे येथील सहजयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम सत्र संस्कृत भाषेमध्ये असेल. त्यानंतर हिंदी, बंगाली, तेलगू, तामिळ, गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी, भोजपुरी, आसामी, मराठी, ओडिया, मैथिली, इंग्रजी आणि सिंधी असे एकूण १६ भाषांमध्ये संपूर्ण भारत देशातील साधक www.sahajayoga.org.in या वेबसाइटवर आणि learningsahajayoga या यू-ट्यूब चॅनेलवर सहजयोग ध्यान साधनेचा अनुभव घेऊ शकतील.या सत्राचा लाभ घेण्याचे आवाहन धुळे जिल्हा सहजयोग समन्वयक रत्नाकर वसईकर, प्रचार प्रसार प्रमुख सतीश भाटिया, युवाशक्ती समन्वयक सचिन सोनवणे यांनी केले आहे.लॉकडाऊनच्या काळात सकाळ-संध्याकाळ ऑनलाइन ध्यानामध्ये शास्त्रीय संगीत व भजन तसेच नवीन साधकांसाठी ध्यान कार्यक्रम व ध्यानामधील गहनता येण्यासाठी नियोजित केलेल्या कार्यशाळेत देश-विदेशांतील लाखो साधकांनी ऑनलाइन सहभागी होऊन ध्यान प्रक्रियेचा लाभ घेतला. ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रिसर्च फाउंडेशनद्वारा सहजयोग संस्था सामूहिकतेत ध्यान करून घेणारी, ऑनलाइन मेडिटेशन घेणारी आशिया खंडातील सर्वांत मोठी संस्था म्हणून गाैरविण्यात आली.यू-ट्यूब चॅनेलवर दररोज सायंकाळी ५ वाजता मराठी-हिंदी भाषेत सहजयोग प्रशिक्षण हा ६ आठवड्यांचा कोर्स राबविला जातो. सहजयोग ध्यान साधना संपूर्णपणे विनामूल्य आहे.  सर्व वयोगटातील लोकांसाठी अत्यंत सरळ व सोपी असून, दैनंदिन १० मिनिटं ध्यानाने प्रत्येक व्यक्ती  आपल्यामध्ये परिवर्तन घडल्याचा अनुभव घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. लाॅकडाऊन काळात या उपक्रमाचा चांगला लाभ झाला.

टॅग्स :Dhuleधुळे