शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरूस्तीसाठी धुळे जिल्ह्यातील दहिवेल फाटा येथे भाजपतर्फे रस्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 11:43 IST

घोषणांनी परिसर दणाणला, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

आॅनलाइन लोकमतसाक्री साक्री तालुक्यातून जाणार राज्य महामार्ग क्रमांक ७ वरील छडवेल कोर्डे ते दहिवेल दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हा रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ता दुरूस्त करावा या मागणीसाठी भाजपतर्फे आज दुपारी दहिवेल फाट्याजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे एकतास केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यास निवेदन देण्यात आले.साक्री तालुक्यातून जाणारा प्रकाशा ते नासिक हा राजमार्ग क्रमांक ७ वर छडवेल कोर्डे ते दहीवेल दरम्यानच्या सुमारे २३ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून दोन अडीच फूट खोल तर पाच ते सात फूट रुंदीचे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे तीन जणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. त्याबाबत संबंधित विभागातील अधिकाº्यांना तोंडी सूचना अनेक वेळा देण्यात आल्या. मात्र त्याची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे आज साक्री तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यशासनाच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन केले. दहिवेल फाटा या ठिकाणी एकतास रस्ता रोको आंदोलन केल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बिरारीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची तात्काळ दखल घेतली नाही तर या राज्यमार्गावरील खड्यांमध्ये लगेच झाडे लावा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला होता. आंदोलनाप्रसंगी पिंपळनेर मंडळाचे भाजपचे अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, वसंतराव बच्छाव, भाजपचे धुळे जिल्ह सरचिटणीस शैलेंद्र आजगे, दत्तू बोरसे, संदीप माळी, रवींद्र चौधरी, प्रवीण देसले, कन्हैय्यालाल माळी, खंडू कुवर, रामलाल जगताप, रावसाहेब खैरनार, केशवराव पाटील, बाबा पाटील, रामदास पाटील, बाबा माळी, हेमंत बच्छाव, रमेश मालचे, प्रवीण राऊत, धनंजय घरटे, रामकृष्ण एखंडे, कोमल जैन, हिराबाई सोनवणे, सुनील माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे