७१ छात्रसैनिकांकडून नदीपात्राची झाली स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 12:42 PM2020-11-29T12:42:35+5:302020-11-29T12:44:00+5:30

पावसाळ्यात अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला

The river basin was cleaned by 71 student soldiers | ७१ छात्रसैनिकांकडून नदीपात्राची झाली स्वच्छता

dhule

Next


धुळे :   शहरातील पांझरा नदीपात्र व परिसरात अनेक दिवसापासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. प्रदुषण व नदी पात्राची स्वच्छता हाेण्यासाठी धुळ्यातील छात्रसैनिकांनी पुढाकार घेऊन पांझरा नदीपात्राची स्वच्छता केली.  या मोहीमेत मनपाचे स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते. 
पावसाळ्यात अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होतो. पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने काटेरी झाडे झुडपांसह विविध उत्सव व अन्य धार्मिक  साहित्याचे निर्माल्य नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जमा झाले हेाते. शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. मात्र नदीपात्राकडे दुर्लक्ष होत असल्याने छात्रसैनिकांनी पुढाकार घेऊन शनिवारी नदीपात्रातील घाण, कचरा व काटेरी झाडे झुडूपे काढून स्वच्छता केली.  
यावेळी कॅप्टन कैलास बोरसे, कॅप्टन किशोर बोरसे, कॅप्टन महेंद्रकुमार वाढे, लेफ्टनंट शशीकांत खलाणे, लेफ्टनंट सुनील पाटील,  लेफ्टनंट क्रांती पाटील,  यांच्यासह एन.सी.ओ. गावडे व राजिंदर सिंग उपस्थित होते.  पांझरा नदी, गणपती मंदिर, कालीका माता मंदिर व शितला माता मंदिर परिसराची स्वच्च्छता केली.
यावेळी ४८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे समादेशक अधिकारी कर्नल बी. व्ही. एस. शिवाराव यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्यात आले. यावेळी मनपाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान हे अभियान नियमित राबवावे अशी अपेक्षा आहे. 

Web Title: The river basin was cleaned by 71 student soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे