शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्येची चाैकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 21:59 IST

बेलदार समजा संघटनेची निदर्शने

धुळे : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणी प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेने केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत वन विभागाचे राज्यमंत्री आणि इतर संबंधित १० वरिष्ठांना निवेदन पाठविले आहे.निवेदनात म्हटले आहे की,  हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना डीएफओ विनोद शिवकुमार यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिला. गर्भवती असताना देखील जंगलात तब्बल तीन किलोमीटर चालण्यास भाग पाडल्याने त्यांचा गर्भपात झाला. वन प्रशासन लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने परिसरात केलेले कार्य वरिष्ठांना खपले नसल्याने त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. वन विभागातील तस्करांना लगाम घालण्यासाठी उचललेले धाडसी पाऊल वरिष्ठांना खुपल्याने डीएफओ विनोद शिवकुमार यांनी त्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून छळ केला. याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षकांना वेळोवेळी तक्रार करूनदेखील त्यांनी दखल घेतली नाही. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत सखोल चाैकशी करून संबंधित दोषींवर त्वरित कारवाई करावी. अन्यथा, भटक्या विमुक्त व ओबीसी बांधवांमार्फत राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती वरीष्ठांना पाठविल्या आहेत.फाशीची शिक्षा द्याअमरावती जिल्ह्यातील मेळघाट वनक्षेत्रामध्ये कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करण्यास भागा पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय महाराठा महासंघाने केली आहे. याबाबत महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन ताकटे, युवक जिल्हाध्यक्ष भुषण बोरसे, साक्री शहराध्यक्ष विक्रमसिंह काळे, तालुकाध्यक्ष रमेश मराठे, बाजीराव खैरनार, पवन शिंदे, सतीष गिरमकर, सुनील ठाणगे, अमोल साळुंखे, संजय नेतकर, राजेंद्र मराठे, उमेश पवार, आशिष देशमुख, विनोद पाटील, कांतीलाल देवरे, दीपक गिरमकर, साहेबराव पाटील, हरीश मिसाळ आदींनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून ही मागणी केली.

टॅग्स :Dhuleधुळे