शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत फक्त एक हरकत प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:20 IST

हरकत दाखल करण्याची आज शेवटची मुदत

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीवर मंगळवारी शिंदखेडा तालुक्यातील मौजे कलमाडी येथून एक हरकत दाखल करण्यात आलेली आहे. तर धुळे, साक्री व शिरपूर तालुक्यातून एकही हरकत दाखल झालेली नाही. ६ रोजी प्रारूप मतदार यादीवर हरकत व सूचना दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.धुळ्यासह राज्यातील पाच जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींच्या निवडणुका विहित कालावधीत घेण्यासाठी ४ आॅक्टोबर २०१९ रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्टÑ विधानसभा मतदार याद्यांचे पारंपारिक पद्धतीने निवडणूक विभाग, निर्वाचक गणनिहाय विभाजन करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.२ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत शिंदखेडा तालुक्यातील मौजे कलमाडी येथील विजेंद्र पाटील यांनी शिंदखेडा तहसील कार्यालयात हरकत दाखल केली आहे. यात मौजे कलमाडी येथील प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये २०० नावे ही दुबार व बोगस असल्याचे दिसून आले आहे. ज्यांचा गावात काहीच संबंध नाही, गावात त्यांना कोणीही ओळखत नाही, अशांची नावे मतदार यादीत टाकण्यात आल्याचे म्हटले आहे. बोगस मतदारांची नावे वगळण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या संदर्भात शिंदखेडा येथील तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, एक हरकत प्राप्त झाली असून, ती नेमकी काय आहे, ते अद्याप बघितले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर उपजिल्हाधिकारी (प्रशासन) उन्मेश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, एकही हरकत प्राप्त नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. मतदार यादीवर हरकत घेण्याची बुधवारी शेवटची मुदत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे