शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात सव्वालाख पाठ्यपुस्तके प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 11:29 IST

समग्र शिक्षा अभियान : शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप होणार

धुळे : पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात ११ विषयांची पहिली ते सहावीपर्यंतची जवळपास १ लाख २० हजार पुस्तके आल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली आहे.दरवर्षी सर्व शिक्षा अभियानांतर्गत ही पुस्तके दिली जात होती. मात्र आता पहिली ते  बारावीपर्यंतचा समावेश समग्र शिक्षा अभियानात करण्यात आलेला असून, त्यांच्यामार्फतच मोफत पाठ्य पुस्तकांचा पुरवठा होतो. पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येतात. यासाठी शिक्षण विभागाने पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी  शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी  जिल्हा परिषदेतर्फे २ लाख ३५ हजार १७० पुस्तक संचाची मागणी नोंदविण्यात आली आहे. यात धुळे तालुक्यासाठी ६० हजार ५४३, शिंदखेडा तालुक्यासाठी ४० हजार ३१५, साक्री तालुक्यासाठी ७१ हजार ७५०, व शिरपूर तालुक्यासाठी ६१ हजार ३५४ पुस्तकांचा समावेश आहे. दरम्यान मागणी केल्यानुसार बालभारतीतर्फे पुस्तकांचा पुरवठा सुरू झालेला आहे. आतापर्यंत मागणी केलेल्या पुस्तकांपैकी फक्त २५ टक्के पुस्तके प्राप्त झालेली आहेत. ही पुस्तके दुधेडिया हायस्कुलमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. पहिली ते तिसरीपर्यंत मराठी, इंग्रजी गणित, शिवाय    तिसरीचे खेळू-करू,शिकू, चौथीचे मराठी व परिसर अभ्यास भाग-१, दहावीचे इतिहास, विज्ञान, गणित, हिंदी अशी एकूण १ लाख २० हजार पुस्तके प्राप्त झालेलेी आहेत. जवळपास ९० टक्के पुस्तके आल्यानंतरच त्यांचे वितरण सुरू होणार आहे.  इयत्ता पाचवी, सातवी आठवीचे सर्व विषयांचे पुस्तके येणे अजून बाकी आहेत. त्याचबरोबर चौथी आणि सहावीचे काही विषयांची पुस्तकेही अद्याप आलेले नाहीत. त्याचबरोबर उर्दू माध्यमांची व सेमी इंग्रजीचीही पुस्तके अजून आलेली नाहीत. दरम्यान बालभारतीतर्फे आता पुस्तकांचा पुरवठा सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये सर्व इयत्तांची सर्व विषयांची पुस्तके मिळतील. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तकांचे वाटप करण्यात येईल, यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केलेले आहे.  पुस्तक मिळत असल्याने, पहिल्यादिवशी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्य प्रमाणात असते. पुस्तक परत करीत नाहीविद्यार्थ्यांना देण्यात येणारी मोफत पुस्तके परत केलीच जात नाही. बोटावर मोजण्याएवढेच विद्यार्थी शाळांना पुस्तके परत करीत असतात. ते पुस्तक इतर गरीब विद्यार्थ्यांना दिली जातात.

दोंडाईचासाठी  ४७ हजार ४४३ पुस्तकांची मागणी

*समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीतील  सर्व  शासकीय शाळा, आणि अनुदानित खासगी  शाळेतील सर्व  विद्यार्थ्यांना  मोफत पाठयपुस्तके पुरविण्यात येणार आहेत .दोंडाईचात विविध शाळातील मराठी माध्यमांचे ५ हजार ९५०,  उर्दू माध्यमातील १३००  अशा ७ हजार २५० विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३९ हजार ५९८  व ७ हजार ८४५  अशी एकूण  ४७ हजार ४४३ पुस्तकाचे वाटप  होणार आहे .शाळेच्या पहिल्याच दिवशी  दोंडाईचासह शिंदखेडा तालुक्यात विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके मिळणार आहेत.   या वर्षी दुसरीची पाठयपुस्तके या वर्षी बदलली आहेत.  समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठपुस्तक ही योजना सुरू केली आहे.  तीन  महिन्यापूर्वी  पुस्तक संचची मागणी  बालभारतीकडे केली. विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तके मिळतील असे नियोजन केले आहे. प्रथम तालुकास्तरावर पुस्तके येणार असून तेथून  शाळास्तरावर वाटप होईल. * शिंदखेडा तालुक्यातील विविध शाळातील  पहिली ते आठवीच्या   मराठी माध्यमाचे  ३८ हजार ४९५ व उर्दू माध्यमाचा १८२० अशा ऐकून  ४० हजार ३१५ विद्यार्थ्यांसाठी   अनुक्रमे २ लाख १५ हजार ६७२  व ११ हजार ३४८ अशा एकूण  २ लाख २७ हजार पुस्तकाची मागणी  केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मनीष पवार, विस्तारधिकारी डी. एस. सोनवणे, दोंडाईचा केंद्र प्रमुख मोहन मोरे यांनी दिली .

टॅग्स :Dhuleधुळे