शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य अधिकाऱ्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST

कापडणे येथील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, गावातील विविध पदाधिकारी, पत्रकार आणि ग्रामस्थांनी कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्राला सोमवारी सकाळी कोविड-१९ ...

कापडणे येथील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, गावातील विविध पदाधिकारी, पत्रकार आणि ग्रामस्थांनी कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्राला सोमवारी सकाळी कोविड-१९ च्या उपाययोजनांसंदर्भात अचानक भेट दिली असता, त्यावेळेस येथे अनेक गैरसोयी आढळून आल्या.

ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींनी वैद्यकीय अधिकारी नागे यांच्याकडे आरोग्यासंदर्भात विविध समस्या मांडल्या. आरोग्य विभागातील कर्मचारी सकाळी आठ तर सायंकाळी साडेपाच वाजतापर्यंत पूर्ण दिवसभर कामावर दिसून येत नाहीत. बहुतांशी कर्मचारी कामावर उशिरा येतात. काही कर्मचारी दांड्या मारतात. बरेच कर्मचारी कापडणे येथे मुख्यालय ठिकाणी कायमस्वरूपी राहत नसल्यामुळे रात्री-अपरात्री रुग्णांवर उपचार करण्यास मोठा अडथळा येतो.

एम. पी. डब्ल्यू. आरोग्य कर्मचारी डी. ए. पाटील व जी. के. महाजन यांनी गावात संशयित रुग्णांची कोरोना रॅपिड ॲन्टिजन चाचणी करून घेणे आवश्यक आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची कामाची वेळी संपूर्ण दिवसभर असूनसुद्धा मात्र दुपारी बारा वाजतानंतर बहुतांशी कर्मचारी घरी निघून जातात. रुग्णालयात दिवसाला व रात्रीला कोणत्या कोणत्या कर्मचाऱ्यांची ड्युटी आहे, तसा लिखित फलक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मुख्य दालनासमोर लावण्यात यावा. जेणेकरून रुग्णांना याची माहिती होईल. जे कर्मचारी कामात कसूर करत असतील, अशा कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरळ तक्रार नोटीस देऊन केलेल्या कारवाईचा आढावा ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना सुपुर्द करावा. कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे पाठीशी घालू नये, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी व कोणी राजकीय दबाव आणत असेल तशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना करावी, त्याचे निवारण केले जाईल, असे आवाहनही लोकप्रतिनिधींनी डॉक्टर नागे यांना केले आहे. दरम्यान कामात बऱ्याच सुधारणा केल्या जातील, अशी माहिती डॉक्टर नागे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना दिली आहे.

यावेळी पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबूराव पाटील, विनय शाळेचे चेअरमन संजय युवराज पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष नवल नामदेव पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे, उपसरपंच प्रतिनिधी अंजनकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य अक्काबाई भिल, मनोहर पाटील, पत्रकार रामकृष्ण पाटील, जिजाबराव माळी, दीपक पाटील, भूषण ब्राह्मणे, विशाल शिंदे, भूषण पाटील, विठोबा माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य शरद माळी, मनोहर माळी आदी उपस्थित होते.