शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ई-पॉसवर थम्ब उमटत नसल्याने रेशनधारक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:36 IST

धुळे - ई-पॉस मशीनवर थंब उमटत नसल्याने अनेक रेशनधारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात ...

धुळे - ई-पॉस मशीनवर थंब उमटत नसल्याने अनेक रेशनधारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसळ यांना नुकतेच निवेदन देण्यात आले असून, रेशनधारकांच्या समस्येचे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सरकारमान्य रेशन दुकानात थंब होत नसल्याने अनेक नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच कुटुंबातील काही सदस्यांनाच धान्य मिळत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. उर्वरित धान्य रेशन दुकानातच पडून राहत असल्याने काळाबाजार वाढला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही रेशन दुकानदार धान्याची काळ्याबाजारात विक्री करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. आधीच काेरोनामुळे जनता आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे शासन त्यांना पुरेसे धान्य मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, रेशन दुकानदार शासनाच्या धोरणाच्या विपरीत वागताना दिसत आहेत. सामान्य जनतेच्या हक्काचे धान्य त्यांना मिळावे, यासाठी योग्य कार्यवाही करावी, अन्यथा पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू तसेच मंत्रालयात तक्रार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर सुलतान अन्सारी, युसूफ शेख, जमील शेख, सलीम अली, सोनिया कुमावत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.