शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचा ढिगारा दाखवत सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:14 IST

जिल्हा प्रशासनाला निवेदन : जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे धरणे आंदोलन

धुळे : अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापूस, मका, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नुकसानीच्या पिकांचा ढिगारा निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दाखवत सरकारचा निषेध करण्यात आला़शहरातील क्यूमाईन क्लबजवळ सकाळी १० वाजता आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना शंभर टक्के भरपाई, सरसकट कर्जमाफी, वाढती महागाई, बेरोजगारी अशा संकटातून सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी आंदोलनात आमदार सुधिर तांबे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. एकीकडे शेतकरी संकटात असतांना सत्ता आणि खुर्ची मिळविण्यासाठी भाजपा सरकार मस्तीत तर दुसरीकडे कृषीप्रधान देशात आणि पुरोगामी महाराष्ट्रात शेकºयांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरावे लागत आहे़ ही महाराष्ट्राच्या दृष्टीने काळीमा फासणारी घटना आहे. शेतकºयांचा आवाज बुलंद करण्यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची काँग्रेसची तयार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरु लागला आहे. त्यामुळे शेतकºयांना आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. भविष्यात सरकार कोणाचेही येऊ द्या शेतकºयांसाठी चालणारा आपला लढा तीव्र केला जाईल असा इशारा आमदार कुणाल पाटील यांनी दिला़यावेळी बाजार समितीची माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, रमेश श्रीखंडे, बाजीराव पाटील, भानुदास माळी, रणजित पावरा, रितेश पाटील, पंढरीनाथ पाटील, रावसाहेब पवार, भानुदास गांगुर्डे, प्रमोद सिसोदे, बापू खैरनार, प्रमोद भदाणे, छोटू चौधरी, शरद माळी, अरुण पाटील, राजीव पाटील, रावसाहेब पाटील, दिनेश बोरसे, अलोक रघुवंशी, बापू नेरकर, नंदु खैरनार साक्री, धिरण अहिरे, किशोर पाटील, प्रकाश पाटील, दिपक देसले,विमलाताई बेडसे, नाजनीन शेख उपस्थित होते.