शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक टर्मिनस ‘बीओटी’वर देण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: March 20, 2017 00:42 IST

महापालिका : नाशिक मनपाकडून मार्गदर्शन मागविणार, त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर

धुळे : महापालिकेने मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ तयार केलेले ट्रक-टर्मिनस ‘बीओटी’वर देण्याचा प्रशासनाचा विचार आहे़ तत्पूर्वी, नाशिक महापालिकेकडून ट्रक टर्मिनससंदर्भात माहिती मागविण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले़महापालिकेने मुंबई-आग्रा रोडवर रेसिडेन्सी पार्कजवळ ट्रक टर्मिनसची निर्मिती केली आहे़ जवळपास ६५ लाख रुपयांचा खर्च करून या ठिकाणी ३० गाळे बांधण्यात आले आहेत़ मात्र हे ट्रक टर्मिनस मनपाने चालवयाचे की ‘बीओटी’वर देऊन आणखी अधिकाधिक सुविधा देऊन चांगल्या पद्धतीने उभारून सुरू करायचे, यावर प्रशासनाचा विचार सुरू आहे़ १९९१ पासून ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव प्रलंबित होता. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी त्यासाठी काम सुरू केले होते़ अवजड वाहनांस बंदी, पण़़़शहरातील दोन ते तीन हजार व्यावसायिक हे ट्रान्सपोर्टेशनचे काम करतात़ त्यामुळे मालवाहतुकीसाठी येणारे ट्रक त्यांना चाळीगाव रोड, ऐंशी फुटी रोड, पारोळा रोड, बाजार समिती परिसर, सुशीनाला पूल, कॉलनी परिसरात उभ्या कराव्या लागतात़ शहरात सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र ट्रक-टर्मिनसची व्यवस्था नसल्याने ट्रकला शहरात यावे लागते़ काही दिवसांपूर्वीच एका ट्रकने आग्रा रोडवर विद्युत डीपीला धडक दिल्याने मोठा अपघात झाला होता़ त्याचप्रमाणे शहरातील रस्ते आधीच अरुंद असून वर्दळदेखील प्रचंड वाढली आहे़ अशा वेळी ट्रकने मार्गक्रमण केल्यास वाहतुकीचा खोळंबा होतो़ परिणामी, शहर वाहतूक शाखेला अडचणींचा सामना करावा लागतो़‘बीओटी’वर देण्याचा प्रस्ताव!पारगमन शुल्क वसुली होत असताना ट्रक चालक-मालक संघटनेकडून मनपा प्रशासनाकडे पार्किंगसाठी जागेची मागणी करण्यात आली होती. यासाठी धरणे आंदोलनही करण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त हनुमंत भोंगळे यांनी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर महापालिकेने ट्रक टर्मिनसची निर्मिती करण्यासाठी गाळे बांधले असले तरी  आनुषंगिक सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे़ अन्यथा, ट्रक-टर्मिनसला प्रतिसाद मिळणार नाही, उलट उभारलेल्या गाळ्यांचे तसेच साहित्याचे नुकसान होईल, अशी भीती मनपा प्रशासनाला आहे़ त्यामुळे ट्रक टर्मिनसच्या माध्यमातून मनपाला उत्पन्न मिळावे यासाठी ते परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने मनपाकडून ट्रक टर्मिनस ‘बीओटी’वर देण्याचा विचार सुरू आहे़ बीओटीवर ते दिल्यास पुरेशा सुविधांची निर्मिती केली जाईल. मात्र काही वर्षे मनपाला उत्पन्न मिळणार नाही़ त्यामुळे यासंदर्भात नाशिक महापालिकेकडून मार्गदर्शन मागविले जाणार असून सोमवारी तसे पत्र पाठविणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़