शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची आतापासूनच तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

धुळे : जिल्ह्यातील काही गावांमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा गावांमध्ये आरोग्य विभागाने अभियान ...

धुळे : जिल्ह्यातील काही गावांमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा गावांमध्ये आरोग्य विभागाने अभियान स्तरावर घरोघरी तपासणी मोहीम राबवावी. त्याबरोबरच संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी आतापासूनच सुरू करीत मूलभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिले.

धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात मंगळवारी दुपारी आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.

साक्री व शिरपूर तालुक्यातील काही गावांमध्ये बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच या गावांमधील बाधित रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून अशा गावांमध्ये पोहोचावे. या पथकांना ग्रामस्तरीय समित्या सहकार्य करतील. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ‘निमा’ या वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांनी सहकार्य करावे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार करणे शक्य होईल. या मोहिमेचे उपविभागीय अधिकारी सनियंत्रण करतील. धुळे व शिंदखेडा तालुक्यात आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हा रुग्णालयात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देण्यात येईल, असे धुळे शाखेचे अध्यक्ष डॉ. जयंत देवरे, सचिव डॉ. दीपक शेजवळ यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखतानाच औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरळीतपणे सुरू राहावेत म्हणून आरोग्य विभागाने अवधान व नरडाणा येथील औद्योगिक वसाहतीतील कामगारांची नियमितपणे रॅपिड अँटिजेन चाचणी करावी. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील दुकानदार, त्यांच्याकडील कामगार, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फेरीवाल्यांची नियमितपणे रॅपिड अँटिजेन चाचणी करावी. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी सांगितले, चाचण्यांची संख्या वाढली असून, पॉझिटिव्हिटीचा दर कमी होत आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सोयीसुविधांची पूर्तता करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.