चार दुचाकीसह चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 20:41 IST2020-09-27T20:40:34+5:302020-09-27T20:41:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : चाळीसगाव रोड पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चार दुचाकी काढून दिल्या आहेत़ ...

Police caught the thief with four bikes | चार दुचाकीसह चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : चाळीसगाव रोड पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चार दुचाकी काढून दिल्या आहेत़ चोरलेल्या चारही दुचाकीसह चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे़ त्याने अजून काय चोरलेले आहे, याची पडताळणी करण्याचे काम पोलिसाकडून सुरुझाले आहे़
चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद २५ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आली होती़ पोलिसांचा शोध सुरु असतानाच सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे यांना गोपनीय माहिती मिळाली़ त्यानुसार, संशयित आरोपी बिलाल अहमद नूर महम्मद अन्सारी (३४, रा़ मौलवीगंज, चांदतारा चौक, धुळे) याला ताब्यात घेण्यात आले़ त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची चौकशी सुरु असताना त्याने चोरलेल्या चार दुचाकी पोलिसांना काढून दिल्या आहेत़ त्यात एमएच १८ एक्स ८३५८, एमएच २० के २८२७, एमएच ४१ एम ९१२५ आणि जीजे ०६ एन ५८४० या चार चोरलेल्या दुचाकींचा समावेश आहे़ चाळीसगाव रोड पोलिसांनी या चारही दुचाकी जप्त केल्या आहेत़
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे, योगेश ढिकले, अजिज शेख, बी़ आय़ पाटील, के़ एऩ वाघ, प्रेमराज पाटील, सुशील शेंडे, नरेंद्र माळी, स्वप्निल सोनवणे यांनी केली़ तपास कर्मचारी भुरा पाटील करीत आहेत़

Web Title: Police caught the thief with four bikes