शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कविंनी स्वरचित काव्याने जिंकली मने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:01 IST

बुद्धपौणिमेचे औचित्य : सामूहिक बुद्धवंदना, खिरदान, संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन 

धुळे : बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून शहरात आयोजित काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  येथील लोक कवी कै.दिपक निकम काव्यधारा मंडळ व जिल्हा बामसेफ युनिटचे कार्यकर्ते संघरत्न नेरकर  यांच्या संयुक्त विद्यमाने संभाप्पा कॉलनी येथील संघरत्न नेरकर यांच्या निवासस्थानी हे कविसंमेलन झाले. सामूहिक बुद्धवंदना, खिरदानप्रथम उपस्थित कवींनी सामुहीक बुद्ध वंदना केली. तसेच बुद्ध पौर्णिमा मंगल दिनानिमित्त याप्रसंगी उपस्थित कवी, कवयित्रींना खिरदानाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कवी शाहीर शंकर पवार, स्वप्निल नेरकर, दत्तात्रय कल्याणकर, प्रल्हाद पवार, झेड.के.पाटील, गोकुळ भामरे, राजेंद्र वाकडे, गुलाब धनजी मोरे, डॉ.श्रीकृष्ण बेडसे, अमोल कांबळे, संविधान नेरकर, साहील कुमार,  रोहन वाघ ईत्यादी उपस्थित कवींनी आपल्या स्वरचित एकापेक्षा एक सरस अश्या काव्य रचना सादर करून काव्य संमेलनात रंगत निर्माण केली तसेच उपस्थितांची दाद मिळवली. ज्येष्ठ कवी प्रा.राम जाधव यांनी आपल्या खास शैलीतून कवी संमेलनाचे सुत्रसंचालन करून कार्यक्रमात उपस्थितांची दाद मिळवली. या कविसंमेलनासाठी शहर तसेच जिल्हाभरातून आलेल्या कवींनी आपला सहभाग नोंदविला. संमेलना मोठा उत्साह दिसला. कविसंमेलन यशस्वीतेसाठी डॉ.श्रीकृष्ण बेडसे, धनंजय गाळणकर, प्रा.राम जाधव दत्तात्रय कल्याणकर आदी कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

टॅग्स :Dhuleधुळे