शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

महागाई किती रडविणार, चार महिन्यात पेट्रोल डिझेलचे भाव आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST

जिल्हाभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोजच काही ना काही पैशांनी वाढ होत आहे. मागील १५ दिवसांपासून दरवाढीचा आलेख चढताच राहत ...

जिल्हाभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोजच काही ना काही पैशांनी वाढ होत आहे. मागील १५ दिवसांपासून दरवाढीचा आलेख चढताच राहत आहे. सोमवारी जिल्ह्यात पेट्रोल जवळपास ९४ रुपये ६्र० पैसे, तर डिझेल ८३ रुपये ८२ पैसे प्रतिलिटर होते. मात्र मागील चार महिन्यांचा आढावा घेतला असता पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. १ नोव्हेंबर २०२० रोजी पेट्रोलचा दर ८८.७६ प्रतिलिटर होता. डिझेल ७६.७३ प्रतिलिटर, तर गॅस सिलिंडर ६२० रुपये होता. तेच एका महिन्यात म्हणजे १ डिसेंबर २०२० रोजी पेट्रोल, डिझेलसह सिलिंडरच्या दरात वाढ झालेली पाहावयास मिळाली. १ डिसेंबर रोजी पेट्रोल ९०.०८ प्रतिलिटर, डिझेल ७८.८६ प्रतिलिटर होते, तर सिलिंडर मात्र ६७० रुपये झाला. तसेच १ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोल ९१.३७ प्रतिलिटर, डिझेल ८०.३४ रुपये प्रतिलिटर झाले, तर सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली. त्याचप्रमाणे १ फेब्रुवारी रोजी पेट्रोल ९३. ८५, डिझेल ८३.०३ होते, तर सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ झाली नसल्याचे पहावयास मिळाले.

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊननंतर आता कुठे सर्व व्यवहार सुरळीत झाले होते; मात्र आता पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

- धीरज जाधव

काेरोनाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे अनेकांनी दुचाकी वाहनांवर व्यवसाय करण्यास सुरुवात केली. व्यवसायात जम बसत असतानाच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत. आता पेट्रोल टाकणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी कराव्यात.

- धनश्री देवरे

मागील चार महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सिलिंडर कसा घ्यावा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सिलिंडरच्या किमती वाढल्याने महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत. गॅस सिलिंडरच्या किमती कमी कराव्यात.

- प्रिया जाधव