शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा युवा संसदेत २४ स्पर्धकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 21:53 IST

नेहरु युवा केंद्र : अनिकेत वाकळे प्रथम

धुळे : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरु युवा केंद्र धुळे आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिट धुळे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा संसद प्रतियोगिता ऑनलाईन पध्दतीने नुकतीच पार पडली.  या स्पर्धेसाठी नवीन शैक्षणिक धोरण भारतातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन आणेल, उन्नत भारत अभियान, नवीन सामान्य स्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, शुन्य बजेट नैसर्गिक शेती शेतकर्‍यांसाठी वरदानच आहे हे चार विषय देण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या प्रतियोगितेत अनिकेत रविंद्र वाकळे याने प्रथम तर जितेंद्र धीरसिंग राठोड याने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोघा विजेत्यांची राज्यस्तरीय युवा  संसद प्रतियोगितासाठी निवड झाली आहे. प्रतियोगितेचे संयोजन आणि सूत्रसंचलन नेहरु युवा केंद्राचे धुळे जिल्हा युवा समन्वयक अशोक कुमार मेघवाल आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे धुळे जिल्हा नोडल अधिकारी तथा झेड. बी. पाटील महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. प्रशांत कसबे यांनी केले. सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. एस. एस. नंदन, प्रा. अनिल चव्हाण, अजय भदाणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, सचिन बागुल यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.   लेखापाल नाना पाटील, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक उमा बागुल, आनंद पाटील, राहुल गोपाळ यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Dhuleधुळे