शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

त्या आठ सदस्यांविना पार पडली पंचायत समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:36 IST

धुळे : येथील पंचायत समितीच्या मंगळवारी झालेल्या मासिक सभेला ते आठ सदस्य अनुपस्थित होते. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे ...

धुळे : येथील पंचायत समितीच्या मंगळवारी झालेल्या मासिक सभेला ते आठ सदस्य अनुपस्थित होते. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे सदस्यत्व रद्द झालेले ओबीसी संवर्गातील आठ सदस्यांविना सभा पार पडली. ३० पैकी केवळ १७ सदस्य सभेला उपस्थित होते. या आठ जागांवर पुन्हा निवडणूक होणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी सदस्यांनी सुचविलेल्या विकासकामांचे कार्यारंभ आदेश जारी करावेत, असे आदेश पंचायत समितीच्या सभापतींनी दिले आहेत.पंचायत समितीची मासिक सभा सभापतींच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी उपसभापती विद्याधर पाटील, गटविकास अधिकारी गौतम सोनवणे उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट, गण आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयाचे पडसाद सभेतदेखील उमटले. पंचायत समितीच्या सभागृहातील ३० सदस्यांपैकी ओबीसी संवर्गातील आठ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यामुळे संबंधित सदस्य सभेत उपस्थित राहू शकले नाहीत. शिवाय इतर पाच सदस्य गैरहजर असल्यामुळे १७ सदस्यांच्या उपस्थितीत मासिक सभा पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या जागांवर दोन आठवड्यांच्या आत फेरनिवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यामुळे कुठल्याही क्षणी फेरनिवडणूक घोषित होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रस्तावित विकासकामांचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून प्रशासकीय मान्यता घ्यावी आणि कार्यादेश द्यावेत, असे आदेश सभापतींनी सर्व विभागप्रमुखांना दिले.

धुळे तालुक्यात सद्य:स्थितीत तालुक्यात कुठेही पाणीटंचाईची स्थिती उद्भवलेली नाही. परंतु तशी परिस्थिती असल्यास तत्काळ विहीर अधिग्रहण करण्याचे कार्यवाही हाती घेण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

जलसंधारणाची २० कामे मंजूर आहेत. यापैकी १२ साठवण बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच तीन लाखांच्या आतील २० कामे आहेत. तीन लाखांवरील दहा कामे असून, त्याची निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. या कामांना एप्रिल महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यात येईल, असे लघुसिंचन विभागातर्फे सांगण्यात आले.