शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेशनधारकांना तांदूळ वाटप करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 22:30 IST

आमदार कार्यालयात निर्णय : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोफत धान्य वितरण

धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा लॉकडाऊन केला आहे़ त्यामुळे अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे़ उपासमारीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेला स्वस्त धान्य लाभार्थ्यांना येत्या दोन दिवसात वितरीत करा अशा सुचना आमदार डॉ़ फारूख शाह यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात़आमदार डॉ़ फारूख शाह यांच्या कार्यालयात सोमवारी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ यावेळी अप्पर तहसीलदार शहर संजय शिंदे, अव्वल कारकून निलेश सांगळे, डॉ. दिपश्री नाईक, डॉ. बी. यु. पवार, आशिष सोनार, हाजी कलीम शाह, सेहबाज शाह, निलेश काटे, वसीम अक्रम, एजाज सय्येद आदी उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे़ त्यामुळे हात मजूर व कष्टकरी कुटुंबाला उपासमारीला सामोरे जावे लागत आहे़ नागरिकांना पुरेसा प्रमाणात धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आमदार डॉ. फारूक शाह यांच्याकडे प्राप्त होत आहे़ तक्रारीची दखल घेऊन आमदार डॉ. शाह यांनी नागरिकांना मोफत धान्याचे वितरण होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी केली़ त्यानुसारतातडीने दखल घेत जिल्हाधिकारी तसेच अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी आमदार डॉ. शाह यांची भेट घेऊन समस्या मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले़ प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी येत्या २ ते ३ दिवसात प्रती सदस्य ५ किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये मोफत वितरण करणार आहेत. तसेच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालयातर्फे धान्याचे वितरण १५ एप्रिल पासून स्वस्त धान्य दुकानातुन केले जाणार आहे़ त्यामुळे गरीब व गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे