शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

सोनगीर पोलिसांच्या दिमतीला एकच वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 21:26 IST

३२ गावांना पेट्रोलिंग करतांना करावी लागते कसरच, अजून एका वाहनाची आवश्यकता

आॅनलाइन लोकमतसोनगीर (जि.धुळे) : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांना संचारबंदीचे काम करावे लागत आहे. मात्र सोनगीर पोलीस स्टेशनच्या दिमतीला केवळ एकच वाहन आहे. त्यामुळे या पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सुमारे ३२ गावांमध्ये गस्त, तसेच पेट्रोलिंग करतांना पोलिसांना कसरत करावी लागत आहे. सोनगीर पोलीस स्टेशनला अजून एका वाहनाची आवश्यकता आहे.मुबंई-आग्रा महामार्गावरील सोनगीर हे धुळे तालुक्यातील बºयापैकी मोठे गाव आहे. सोनगीर पोलीस स्टेशनांतर्गत सोनगीरसह ३२ गावे येतात. या पोलीस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक दर्जाचे एक अधिकारी व ३८ पुरुष व महिला कर्मचारी मिळून एकूण ३९ जणांच्या खांद्यावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. दरम्यान पोलीस ठाणेच भौगोलिक क्षेत्र ६६० चौरस किलोमीटर इतके आहे. या पोलीस स्टेशन अंतर्गत २७ ग्रामपंचायती येतात. ३२ गावांमधील पूर्व व पश्चिमेला शेवटच्या गावाचे अंतर हे ४५ ते ५० किलोमीटर एवढे आहे. दरम्यान हे अंतर पार करण्यासाठी खूप वेळ जात असतो. त्यात रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता शेवटच्या गावापर्यंत पोहचणे पोलिसांना खूप अवघड जात असते. दरम्यान पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गावांमध्ये गस्ती घालण्यासाठी एकच सरकारी वाहन आहे. या व्यतिरिक्त पोलीस कर्मचारी आपल्या ताब्यातील दुचाकींचा वापर कामासाठी करीत असतात. दरम्यान आणखी एक चार चाकी वाहनांची नितांत गरज आहे.पोलिसांना कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदीचे काम करावे लागत आहे. त्याचबरोबर सोनगीर व परिसरातील गावांमध्ये शांतता राखण्याचे मोठे आव्हान आहे. पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण तसेच विविध प्रकरणात तपासाचे कामकाज नागरिकांचे तक्रारी निवारण करणे तसेच आदी कामे सुरळीत करण्यात अडचणी येतात. दरम्यान नुकताच उपनिरीक्षक दर्जाचे राजेंद्र पाटील हे सेवानिवृत्त झालेत. या मुळे कामाचा ताण आणखीनच वाढला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे